Gold Silver Price : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचा विचार आहे? एकदा भाव पाहून घ्या!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचा विचार आहे? एकदा भाव पाहून घ्या!

Gold Silver Price : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचा विचार आहे? एकदा भाव पाहून घ्या!

HT Marathi Desk HT Marathi
Oct 28, 2024 06:19 PM IST

Gold Silver Price Today : धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आयबीजेएनं हे दर जाहीर केले आहेत.

धनतेरसपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आज दरात इतकी वाढ
धनतेरसपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आज दरात इतकी वाढ

Gold Silver Price : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र ही खरेदी यंदा महागात पडणार आहे. सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात सोन्याचा भाव शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत ४८० रुपयांनी वधारून ७८४९५ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात प्रतिकिलो ७५२ रुपयांनी वाढ झाली आहे. 

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. शहरानुसार या दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. 

यावर्षी सोने प्रति १० ग्रॅम १५,१४३ रुपयांनी महागले आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या कालावधीत चांदी ७३३९५ रुपयांवरून ९६५५२ रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत २३१५७ रुपयांची वाढ झाली आहे.

आजचा भाव किती?

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १४ रुपयांनी वाढून ४७७ रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९ रुपयांनी वाढून ७१९०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३६० रुपयांनी वाढला असून तो तोळ्यामागे ५८८७१ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २८१ रुपयांनी घसरून तोळ्यामागे ४५९२० रुपये झाला आहे.

जीएसटीसह सोन्याचा भाव किती?

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ८०,८४९ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यातील २३५४ रुपये जीएसटीशी संबंधित आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ८०५२६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २३४५ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर आज ते जीएसटीसह ७१९०१ रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये २१५७ रुपये जीएसटी म्हणून जोडले जातात. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९९५५२ रुपयांवर पोहोचला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बाँड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

Whats_app_banner