Gold Silver Rates Today 23 august 2024 : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसत आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोने आणि चांदी हे दोन्ही आज स्वस्त झालं आहे.
सोन्याचा भाव (Gold Price) आज २७४ रुपयांनी घसरून ७१,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदीही ७४८ रुपयांनी घसरून ८४,०७२ रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुवारी सोने ७१,५९९ रुपये आणि चांदी ८४,८२० रुपयांवर बंद झाली होती.
२३ कॅरेट सोन्याचा भाव आज २७३ रुपयांनी स्वस्त होऊन ७१,०३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर, २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २५१ रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ६५,३३४ रुपयांवर खुला झाला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २२५ रुपयांनी कमी होऊन ४३,४९४ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी कमी होऊन ४१,७२५ रुपये झाला आहे.
सोने आणि चांदीचे हे दर इंडिय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (India bullion and jewellers association) जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. त्यामुळं तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या प्रत्यक्ष दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.
जीएसटीमुळं २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७३,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७३,१७० रुपये आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २१३१ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोनं आज जीएसटीसह ६७,२९४ रुपयांवर पोहोचलं आहे. त्यात १९६० रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे.
१६०४ रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याची किंमत आता ५५,०९८ रुपये झाली आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा होत नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८६,५९४ रुपयांवर पोहोचला आहे.