मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोन्याच्या किंमती जैसे थे तर चांदीत २०० रुपयांची वाढ, पहा आजचे दर

Gold Silver price today : सोन्याच्या किंमती जैसे थे तर चांदीत २०० रुपयांची वाढ, पहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 20, 2023 09:56 AM IST

Gold Silver price today : सोन्याच्या किंमतीत आज कोणतेही बदल झालेले नाहीत. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ झाली आहे. देशाच्या विविध शहरांतील आजचे सोने चांदीचे दर येथे पहा.

GoldHT
GoldHT

Gold Silver price today : आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. काल २२ कॅरेटसाठीचा दर अंादाजे ५२१५० रुपये प्रती तोळा होता. तर २४ कॅरेटचा अंदताजे ५६८९० रुपये प्रती तोळा आहे. कालही किंमती अशाच स्थिर होत्या.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

चांदीच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर चांदीच्या किंमतीत आज २०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर काल गुरुवारी अंदाजे ७१९०० रुपये प्रती किलोंच्या घरात होते. आज ते अंदाजे ७२१०० रुपये आहेत.

सोने चांदीच्या किंमतींवर परिणाम करणारे घटक

महागाई: महागाईच्या काळात आपले चलन कमकुवत होते आणि अशा परिस्थितीत लोक सोन्याच्या रूपात पैसे ठेवतात. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते.

व्याजदर: सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

भू-राजकीय संकट: चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव, किंवा अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव किंवा अमेरिका-चीन व्यापार युद्ध यामुळे सोन्याचे भाव कसे वाढले आहेत, हे अलीकडेच दिसून आले आहे. कारण सोन्याकडे सुरक्षिततेचे स्रोत म्हणून पाहिले जाते आणि अशा वेळी लोक सोन्यात आपला निधी गुंतवायला सुरुवात करतात.

डॉलर-रुपया समीकरण: अमेरिकन डॉलरच्या कामगिरीचा भारतातील सोन्याच्या दरावर खूप प्रभाव पडतो. डॉलरच्या घसरणीमुळे रुपयात सोन्याच्या किमतीत वाढ होईल आणि डॉलरची किंमत वाढल्यास उलट होईल.rutu

शहर सोने २२ कॅरेट सोने २४ कॅरेटचांदी 
चेन्नई५२९००५७७१०७२१००
मुंबई५२०००५६७३०७३५००
नवी दिल्ली५२१५०५६८९०७२१००
कोलकाता५२०००५६७३०७२१००
बंगळूरु५२०५०५६७८०७३५००
हैदराबाद५२०००५६७३०७३५००
केरळ५२०००५६७३०७२१००
पुणे५२०००५६७३०७२१००

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग