लग्नकार्याची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोने व चांदीच्या भावात घसरण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  लग्नकार्याची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोने व चांदीच्या भावात घसरण

लग्नकार्याची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोने व चांदीच्या भावात घसरण

HT Marathi Desk HT Marathi
Nov 07, 2024 03:16 PM IST

Gold Silver rate Today 7 November 2024 : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारत असलेलं सोनं आता घसरलं आहे. त्यामुळं ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे.

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, दरात मोठी घसरण
सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, दरात मोठी घसरण

Gold Silver rate Today : लग्नसराईच्या सीझनपूर्वी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६५५६ रुपयांवर पोहोचला आहे. मात्र आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा दर आयबीजेएचा आहे. यात जीएसटीचा समावेश नाही.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

आज, ७ नोव्हेंबर रोजी २३ कॅरेट सोन्याचा भाव १५७४ रुपयांनी कमी होऊन ७६२४९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १२८ रुपयांनी कमी होऊन ६९,९९६ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ११२५ रुपयांनी कमी झाला असून तो ४७४१७ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ९२५ रुपयांनी घसरून ४४७८५ रुपये झाला आहे.

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,८५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २२९६ रुपये जीएसटीशी संबंधित आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७८५३६ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२८७ रुपयांची भर पडली आहे. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव 92857 रुपयांवर पोहोचला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बाँड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

Whats_app_banner