मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोने दराची उच्चांकी पातळी कायम, पहा एक तोळ्यासाठी किती मोजावे लागतील पैसे?

Gold Silver price today : सोने दराची उच्चांकी पातळी कायम, पहा एक तोळ्यासाठी किती मोजावे लागतील पैसे?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 26, 2023 07:19 AM IST

Gold Silver Price today 26 January 2023 : सोन्याच्या किंमतींनी बुधवारी गाठलेली उच्चांकी पातळी आजही कायम ठेवली आहे. चांदीच्या किंमतींती वाढ कायम आहे.

Gold SIlver HT
Gold SIlver HT

Gold Silver Price today 26 January 2023 : इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, बुधवारी बाजार बंद होतेवेळी सोन्याची किंमत २४ कॅरेटसाठी किंमत अंदाजे ५७१३८ रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती. हे दर बुधवारी सकाळच्या सत्रातही कायम होते. २२ कॅरेटसाठीही सोन्याच्या किंमती आज ५२८५० रुपये प्रती तोळा होत्या.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

चांदीच्या किंमतीही आज अंदाजे ७२५०० रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. कालच्या तुलनेतील दोन्ही मौल्यवान धातूंनी किंमतींनी उच्चांकी पातळी कायम ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाच्या तुलनेत डाॅलर्सचे मूल्य वधारले आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. बुधवारच्या सत्रात डाॅलर्सच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८१.३६ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. डाॅलर्सच्या तुलनेत त्यात १२ पैशांची घट झाली.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे दर -

शहरसोने २२ कॅरेट सोने २४ कॅरेट चांदी 
मुंबई५२७००५७४९०७४०००
चेन्नई५३४५०५८३१०७२५००
नवी दिल्ली५२८५०५७६५०७२५००
कोलकाता५२७००५७४९०७४०००
बंगळूरु५२७५०५७५५०७४०००
हैदराबाद५२७००५८४९०७४०००
केरळ५२७००५७४९०७२५००
पुणे५२७००५७४९०७२५००

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग