मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : घसरणीनंतर सोन्याच्या किंमती स्थिर, चांदीच्या किंमतीत बदल नाही, पहा आजचे दर

Gold Silver price today : घसरणीनंतर सोन्याच्या किंमती स्थिर, चांदीच्या किंमतीत बदल नाही, पहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 23, 2023 08:59 AM IST

Gold Silver price today : आज, 23 जानेवारी 2023, सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी रविवारी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली होती. अशा परिस्थितीत तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे बाजारभाव -

Gold HT
Gold HT

Gold Silver price today : सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने तेजी सुरू होती. यानंतर २२ जानेवारी रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्या आहेत. त्या आज स्थिर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी आज ५२४०० रुपये प्रती तोळा आहेत. तर २४ कॅरेटसाठी ते आज अंदाजे ५७२१० रुपये प्रती तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. आज २३ जानेवारीला बाजारात असा असेल चांदीचा भाव आज १ किलो चांदीची किंमत ७४,३०० रुपये आहे.

सोन्या-चांदीच्या किमती कशा ठरवल्या जातात

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही सेंट्रल प्राईज आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतात.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीचे दर -

शहर२२ कॅरेट सोने (रु.प्रती तोळा)२४ कॅरेट (रु.प्रती तोळा)चांदी (रु.प्रती किलो)
चेन्नई५३२००५८०४०७४३००
मुंबई५२२५०५७०६०७२३००
नवी दिल्ली५२४००५७२१०७२३००
कोलकाता५२२५०५७०६०७४३००
बंगळूरु५२३००५७११०७४३००
हैदराबाद५२२५०७०६०७२३००
पुणे५२२५०५७०६०७२३००

WhatsApp channel

विभाग