मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 06, 2022 08:57 AM IST

Gold Silver Price Today 6th October 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. जाणून घ्या देशातील मुख्य शहरातील आजचा भाव.

आजचा सोने-चांदीचा भाव
आजचा सोने-चांदीचा भाव (Reuters)

आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंडनुसार आज सराफा बाजारात सोन्याचा भाव ४०० रुपयांनी वधारला, तर दुसरीकडे आज एक किलो चांदीच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. देशात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,७५० आहे,आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत ६२,००० रुपये प्रति किलो झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

चेन्नई         : ४८,३५० (२२ कॅरेट), ५२,७५० (२४ कॅरेट)

मुंबई         : ४७,७५० (२२ कॅरेट), ५२,१०० (२४ कॅरेट)

दिल्ली       : ४७,९०० (२२ कॅरेट), ५२,२५० (२४ कॅरेट)

कोलकाता : ४७,७५० (२२ कॅरेट), ५२,१०० (२४ कॅरेट)

जयपूर      : ४७,९०० (२२ कॅरेट), ५२,२५० (२४ कॅरेट)

लखनऊ   : ४७,९०० ( २२ कॅरेट), ५२,२५० (२४ कॅरेट)

पाटणा     : ४७,७८० (२२ कॅरेट), ५२,१३० (२४ कॅरेट)

पुणे         : ४७,७८० (२२ कॅरेट), ५२,१३० (२४ कॅरेट)

नागपूर   : ४७,७८० (२२ कॅरेट), ५२,१३० (२४ कॅरेट)

नाशिक   : ४७,७८० ( २२ कॅरेट), ५२,१५० (२४ कॅरेट)

चांदीची आजची किंमत

आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला आहे. आज सरासरी किंमत ६२,००० रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत ६२,००० रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत ६७,००० रुपये प्रति किलो आहे.

(सोन्या-चांदीच्या दिलेल्या किमती सूचक आहेत. यात जीएसटी किंवा इतर कोणत्याही कराचा समावेश नाही.)

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

१. सोन्याच्या दागिन्यांमध्ये, ज्वेलर्स स्वतंत्रपणे मेकिंग चार्जेस आकारतात. खरेदी करताना ही माहिती आवर्जून घ्या.

२. खरेदी करताना रिटर्न पॉलिसीबद्दल माहिती घ्या.

३. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी देते.

WhatsApp channel

विभाग