मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : आज गुरुपुष्यामृत योग, सोने चांदी झाले महाग, जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price Today : आज गुरुपुष्यामृत योग, सोने चांदी झाले महाग, जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 25, 2023 08:53 AM IST

Gold Silver price today 25 May 2023 : आज गुरुपुष्यामृत योग आहे. आज सकाळी ६ वाजेपासून ते संध्याकाळी ५.५२ वाजेपर्यंत मुहूर्ताचे सोने खरेदीसाठी संधी आहे. त्यामुळे सोने चांदीचे आजचे दर जाणून घेण्यासाठी इथे चेक करा.

gold silver HT
gold silver HT

Gold Silver price today 25 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज संध्याकाळी सोन्याचा भाव ६०६८० रुपये होता. आज सकाळी हा दर ६०७०४ रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात २४ रुपयांची घसरण झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ६०३२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत तो प्रति १० ग्रॅम ३३८ रुपयांच्या वाढीसह बंद झाला आहे.

याशिवाय बुधवारी चांदीचा दर ७११२९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर सकाळी ७१३३७ रुपये प्रति किलो या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीच्या दरात २०८ रुपयांची घसरण झाली आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७०७१८ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात किलोमागे ४११ रुपयांची वाढ झाली.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग