मराठी बातम्या  /  business  /  Gold Silver Price Today : गेल्या सत्राच्या तुलनेत सोने चांदी झाले स्वस्त, पाहा आजच्या किंमती
Gold HT
Gold HT

Gold Silver Price Today : गेल्या सत्राच्या तुलनेत सोने चांदी झाले स्वस्त, पाहा आजच्या किंमती

24 May 2023, 8:44 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Silver price today 24 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६०,३४२ रुपये होता. सकाळी हा दर ६०४५० रुपये होता. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात १०८ रुपयांची घसरण झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ६०८२९ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे तो मागील व्यापार दिवसाच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम ४८७ रुपयांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

याशिवाय आज चांदीचा दर ७०७१८ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. हा दर आज सकाळी ७१५६८ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळ ते सायंकाळदरम्यान चांदीच्या दरात ८५० रुपयांची घसरण झाली आहे.

शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७२५२१ रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीचा दर प्रतिकिलो १८०३ रुपयांनी कमी झाला आहे.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

विभाग