मराठी बातम्या  /  business  /  Gold Silver Price Today : सोने दराने गाठला ६० हजारांचा टप्पा, चांदी ७२ हजारपार, पहा आजचे दर
Gold Silver HT
Gold Silver HT

Gold Silver Price Today : सोने दराने गाठला ६० हजारांचा टप्पा, चांदी ७२ हजारपार, पहा आजचे दर

19 March 2023, 1:18 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Silver price today 19 March 2023 : जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता निर्माण होते तेंव्हा सोन्याच्या किमती नव्या किंमतींच्या उच्चांकासाठी झेपावतात.

Gold Silver price today 19 March : गेल्या आठवड्यात शुक्रवारी एमसीएक्सवर दिवसभरात सोन्याचा भाव ५९,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. दिवसाच्या व्यवहाराअंती १० ग्रॅम सोन्याचा दर ५९,४२० रुपये होता.

ट्रेंडिंग न्यूज

सोन्याचा भाव ६० हजारांपर्यंत

कमोडिटी आणि चलन तज्ञ अनुज गुप्ता यांनी वायदे बाजारात सोने आणि चांदी खरेदीशी संबंधित धोरणाबाबत सांगितले की, अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्यामुळे पुढील आठवड्यात सराफा कल कायम राहण्याची शक्यता आहे. पण पुढील आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा स्तर ओलांडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आजच्या किंमतींचा कल

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कालच्या तुलनेत सुस्साट वेगाने वाढल्या आहेत. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५५४५० रुपये प्रती तोळा आहेत. काल त्या अंदाजे ५३९५० रुपये प्रती तोळा होत्या.त्यामुळे २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमतीत आज तब्बल १५०० रुपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज अंदाजे ६०,४७० रुपये प्रती तोळा पोहोचल्या आहेत. काल त्या ५८८४० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज त्यात १६३० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमतीतही आज चांगलीच वाढ झाली आहे. आज किंमत ७२१०० रुपये प्रती किलो आहेत. काल त्या अंदाजे ६०८०० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतीत २३०० रुपयांची वाढ झाली आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने

जागतिक पातळीवर भूराजकीय अस्थिरता, महागाई यांचे मळभ कायम असताना अमेरिकेतील बँकांच्या पेचामुळे साऱ्या वित्तीय जगाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यापासून विशेषतः अमेरिकेतील बँकांच्या परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पारंपारिक, सुरक्षित व सार्वभौम असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक पातळीवर आठवड्यात सोने प्रति औंस (३१.१० ग्रॅम) ६.४८ टक्के वाढून १९८८.८५ डॉलरच्या पातळीवर पोचले. त्या आधीच्या आठवड्यात सोने १८६७ डॉलरवर होते. भारतात एमसीएक्सवर सोने प्रति दहा ग्रॅम ५९,४६१ रुपयांच्या उच्चांकावर गेले. या पूर्वीचा सोन्याचा उच्चांक ५९,४२० रुपये होता. आठवड्यात सोन्यात ५.८६ टक्के वाढ आहे. गेल्या आठड्यात सोने ५६,१३० रुपयांच्या पातळीवर होते. वर्षभराचा विचार केल्यास सोन्याने ८ टक्के म्हणजे सुमारे ४३६६ रुपयांचा प्रति दहा ग्रॅममागे परतावा दिला आहे.

एसएमएसवर जाणून घ्या सोने चांदीचे दर

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

विभाग