Gold Silver price today 18 September 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम ६००६० रुपये आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ६००६० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे २,४६० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
सोमवारी चांदीचा दर ७४७०० रुपये प्रति किलोवर उघडला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ७४७०० प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचे दर स्थिर आहेत.
सोन्यात गुंतवणूक सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.कारण गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने दरात चांगलीच घसरण झाली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. अशा परिस्थितीत लोक तात्काळ फायद्यासाठी रोख्यांमध्ये पैसे गुंतवत आहेत. सोन्यामधील ही गुंतवणूक केवळ एका वर्षात योग्य नफा मिळवू शकते.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.