मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतीत झाली घट, आज खरेदीचा करा सुवर्णमुहूर्त

Gold Silver Price Today : सोने चांदीच्या किंमतीत झाली घट, आज खरेदीचा करा सुवर्णमुहूर्त

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 18, 2023 08:50 AM IST

Gold Silver price today 18 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६०६४६ रुपये राहिला. सकाळी हा दर ६०६१८ रुपये होता. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात २८ रुपयांची घट झाली आहे.

Gold Silver HT
Gold Silver HT

Gold Silver price today 18 May 2023 : इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, बुधवारी संध्याकाळी सोन्याचा बंद भाव ६०६४६ रुपये राहिला. सकाळी हा दर ६०६१८ रुपये होता. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान सोन्याच्या दरात २८ रुपयांची घट झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

दुसरीकडे, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने ६१०६६ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते. अशाप्रकारे तो मागील ट्रेडिंग डे च्या तुलनेत प्रति १० ग्रॅम ४२० रुपयांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

सोने आज उच्चांकीवरुन १००० रुपयांनी स्वस्त होत आहे. यापूर्वी, ४ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१६४६ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

चांदीचा दर

याशिवाय बुधवारी चांदीचा दर ७१८०८ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. सकाळी हा दर ७१७३९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला होता. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ दरम्यान चांदीच्या दरात ६९ रुपयांची घट झाली आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा हा दर ७१९३० रुपये प्रति किलो होता. त्यामुळे कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात प्रतिकिलो १२२ रुपयांची घट नोंदवण्यात आली.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग