मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Rate : लगीनसराई सुरू असताना सोन्याच्या भावात घसरण, चांदीचा रंगही उडाला!

Gold Silver Rate : लगीनसराई सुरू असताना सोन्याच्या भावात घसरण, चांदीचा रंगही उडाला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 18, 2024 07:09 PM IST

Gold Silver Price News : महिनाभरापूर्वी ६४ हजाराच्या जवळपास पोहोचलेला सोन्याचा भाव आज ऐन लगीनसराईत ६२ हजारांच्या खाली आला आहे.

Gold Price
Gold Price

Gold Silver Rate : लग्नकार्य काढलेल्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आजही सोन्या-चांदीचे भाव घसरले असून सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं २९५ रुपयांनी स्वस्त झालं आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

लगीनसराईच्या दिवसात सोने व चांदीचे भाव सर्वसाधारणपणे चढे असतात. मात्र, यावेळी ऐन लग्नाच्या दिवसांत सोने व चांदीचे भाव घसरताना दिसत आहे. सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ६१,९८२ रुपयांवर खुला झाला. तर, चांदीचा भाव आता ११६ रुपयांनी घसरून ७१,०७५ रुपये प्रति किलो झाला आहे. 

Investment : जास्तीत जास्त नफ्यासाठी २०२४ मध्ये कुठं गुंतवणूक करावी?; एक्सपर्ट्सनी दिला महत्त्वाचा सल्ला

जानेवारी महिन्यात लग्नाचे एकूण ९ शुभ मुहूर्त आहेत. या महिन्यात १६ आणि १७ तारखेला लग्नाचे मुहूर्त होते. आता २०, २१, २२, २७, २८, ३० आणि ३१ तारखेला मुहूर्त आहेत. अशा परिस्थितीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

सोनं त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत १,८२३ रुपयांनी स्वस्त आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी सोनं ६३८०५ रुपये होते. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त भाव होता. आज ते या भावापेक्षा १८२३ रुपयांनी स्वस्त आहे. 

सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जारी केले आहेत. आयबीजेएच्या दरांनुसार, दिल्ली, मुंबई, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर आणि पाटणा या सर्व शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या सरासरी किमतीत घट झाली आहे. या दरामध्ये जीएसटी आणि दागिने बनवण्याच्या शुल्काचा समावेश नाही. त्यामुळं आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरापेक्षा तुम्हाला सोनं-चांदी १००० ते २००० रुपयांनी महाग पडण्याची शक्यता आहे.

Jio Recharge: जिओच्या २०९ रुपयांच्या रिचार्जमध्ये २८ जीबी डेटा, फ्री एसएमएस आणि हवं तितकं बोला!

सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ६१,७३४ रुपये आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ५७,७७६ रुपये आहे. दुसरीकडं, आज म्हणजेच गुरुवारी १८ कॅरेट सोन्याचा दर प्रत्येक दहा ग्रॅमला ४६,९९६ रुपये आहे. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत ३६,६५७ रुपये आहे.

WhatsApp channel

विभाग