मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : आज सोने चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ

Gold Silver Price Today : आज सोने चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 16, 2023 07:06 AM IST

Gold Silver price today 16 May 2023 : आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. जाणून घ्या आजच्या किंमती

gold silver HT
gold silver HT

Gold Silver price today 16 May 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोन्याचा दर ६१२३५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर उघडला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो ६०९६४ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात २७१ रुपये प्रति दहा ग्रॅमची वाढ झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून ३५० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

तर आज चांदीचा दर ७२५६५ रुपये प्रति किलो इतका आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदी ७२०४० प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा दर ५२५ रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला. एमसीएक्सवरील या दरांच्या तुलनेत प्रत्यक्ष सराफा बाजारातील किंमतींमध्ये फरक असतो.त्यात विविध कर आणि मेकिंग चार्जेस अंतर्भूत केल्यानंतर दागिन्यांच्या किंमती वाढतात.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

विभाग