मराठी बातम्या  /  business  /  Gold Silver Price Today : सोने घटले चांदी वधारली, जाणून घ्या आजचे नवे दर
Gold HT
Gold HT

Gold Silver Price Today : सोने घटले चांदी वधारली, जाणून घ्या आजचे नवे दर

16 March 2023, 9:04 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Silver price today 16 March 2023 : अमेरिकेत बँकेतील अस्थिरता, वाढती महागाई या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने दरांवर स्पष्ट दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Gold Silver price today 16 March 2023 : अमेरिकेत बँकेतील अस्थिरता, वाढती महागाई या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने दरांवर स्पष्ट दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कालच्या तुलनेत घसरण झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५३२०० रुपये प्रती तोळा आहेत. काल त्या अंदाजे ५३३०० रुपये प्रती तोळा होत्या.त्यामुळे २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमतीत आज १०० रुपयांची घट झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज अंदाजे ५८०२० रुपये प्रती तोळा पोहोचल्या आहेत. काल त्या ५८१३० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज त्यात ११० रुपयांची घसरण झाली आहे.

मात्र चांदीच्या किंमतीत आज वाढ झाली आहे. आज किंमत ६९००० रुपये प्रती किलो आहेत. काल त्या अंदाजे ६८५०० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ झाली आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने

अमेरिकेत बँक बुडल्याची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. प्रथम १८६५ डाॅलर्स प्रती औंस असलेल्या किंमतींमध्ये ५७ डाॅलर्सची वाढ नोंदवत त्या अंदाजे १९२२ डाॅलर्स प्रति औंस (31.1 ग्रॅम) वर पोहोचल्या आहेत.

त्यामुळे देशांतर्गत पातळीवर सोने चांदीच्या किंमतीत पुढील महिन्याभरात तरी घट होण्याची शक्यता नाही. परिणामी लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या तसेच चांदीच्या किंमती चढ्याच राहतील, असे सुतोवाच ज्वेलर्स एसोसिएशनचे अध्यक्ष नवरतनमल संचेती यांनी केले आहे.

एसएमएसवर जाणून घ्या सोने चांदीचे दर

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

विभाग