Gold Silver price today 13 September 2023 : इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, गुरूवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५८६५० रुपये झाला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ५८७९१ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा दर १४१ रुपयांची घसरण झाली आहे.
सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे २,४६० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
गुरूवारी चांदीचा दर ७००९६ रुपये प्रति किलोवर उघडला. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ७०९२५ प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरातही प्रतिकिलो ८२९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या