मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : सोन्यापेक्षा चांदी झाली स्वस्त, ४००० रुपयांनी घसरले दर

Gold Silver Price Today : सोन्यापेक्षा चांदी झाली स्वस्त, ४००० रुपयांनी घसरले दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 15, 2023 08:04 AM IST

Gold Silver price today 15 May 2023 : सोन्या-चांदीच्या दरांसाठी गेल्या आठवड्यात वाईट होता. गेल्या आठवड्यात सोन्यापेक्षा चांदीचा भाव अधिक घसरला. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ते जाणून घेऊया.

Gold Silver HT
Gold Silver HT

Gold Silver price today 15 May 2023 : सोन्याचा दर गेल्या आठवड्यात घसरला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा दर ६०९६४ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर बंद झाला होता. दुसरीकडे, गेल्या सोमवारी सोन्याचा हा दर ६११६९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशाप्रकारे गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम २०४ रुपयांनी स्वस्त झाला.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा दर ७२०४० रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. दुसरीकडे, गेल्या सोमवारी चांदीचा दर ७६३१५ रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. अशाप्रकारे आठवडाभरात चांदीचा दर किलोमागे ४२७५ रुपयांनी घसरला आहे.

आज सोन्याच्या किंमती २४ कॅरेटसाठी ६१९५० रुपये आहेत. कालच्या तुलनेत किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर २२ कॅरेटसाठी आजचे दर हे अंदाजे ५६८०० रुपये प्रति तोळा आहेत.

चांदीच्या किंमती आज ७४८०० रुपये प्रति किलोंच्या दरात आहे. त्यात कालच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाही.

असे चेक करा तुमच्या शहरांतील किंमती

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग