gold silver rate today 26 June 2024 : शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी नवनवे उच्चांक नोंदवत असताना दुसरीकडं पारंपरिक गुंतवणुकीचं लोकप्रिय साधन असलेल्या सोन्या-चांदीचे भाव गडगडले आहेत. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (Sensex) ७९,००० च्या दिशेनं झेपावत आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (Nifty) २४ हजारच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडं, सोनं प्रति दहा ग्रॅम ७१,००० पर्यंत खाली आलं आहे आणि चांदीचा भाव १७४५ रुपयांनी घसरून ८६,५७० रुपये प्रति किलो झाला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ४८७ रुपयांनी घसरून ७१,२५२ रुपये झाला आहे.
२३ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ४८५ रुपयांनी घसरून ७०९६७ रुपये झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ४४६ रुपयांनी घसरून ६५,२६७ रुपये झाला आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव ३६५ रुपयांनी घसरून ५३,४३९ रुपये झाला आहे.
१४ कॅरेट सोन्याचा भाव २८५ रुपयांनी कमी होऊन ४१,६८२ रुपये झाला आहे.
चांदी १७४५ रुपयांनी घसरली असून आज ती किलोमागे ८६५७० रुपयांवर आली आहे.
आज जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा दर ७३,०९६ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह तो ८०४९५ रुपयांच्या जवळपास असेल.
मात्र, २२ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ६७२२५ रुपयांवर आला आहे. दागिने बनविण्याचं शुल्क आणि नफा जोडल्यानंतर तो सुमारे ७३९४७ रुपये प्रति १० ग्रॅम असेल.
जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याची किंमत ५५,०४२ रुपये आहे. ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा मिळून त्याची किंमत ६०,५४६ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जात आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ७३,३८९ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. मात्र, जीएसटीमुळं चांदीचा भाव ८९,१६७ रुपये प्रति किलो होईल.
(डिस्क्लेमर : सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.)
संबंधित बातम्या