Gold Silver Price today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत किरकोळ बदल झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६६ रुपयांनी उघडून तोळ्यामागे ६९,७२९ रुपये झाला आहे. तर, चांदी ७३ रुपयांनी महागली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जाहीर केलेल्या दरानुसार, २३ कॅरेट सोन्याचा भाव आज ६६ रुपयांनी वाढला आणि प्रति १० ग्रॅमला ६९,४५० रुपये झाला. तर, २२ कॅरेट सोन्याच्या दरात केवळ ६१ रुपयांची वाढ झाली आहे. दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५० रुपयांनी वाढून ५२,२९७ रुपयांवर पोहोचली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव आज ५८ रुपयांनी घसरून तोळ्यामागे ४०,७९२ रुपये झाला आहे. सोने आणि चांदीचे हे दर IBJA नं जाहीर केले आहेत. जीएसटी आणि दागिने बनवण्याच्या (घडणावळ) शुल्काचा यात समावेश नाही. त्यामुळं प्रत्यक्ष खरेदी करताना तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या किमतीत १ ते २ हजार रुपयांचा फरक असू शकतो.
जीएसटीच्या रकमेचा समावेश केल्यास २४ कॅरेट सोन्याचा भाव आता तोळ्यामागे ७१,८२० रुपये झाला आहे. तर, २३ कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीसह ७१,५३३ रुपये झाली आहे. यात ३ टक्के जीएसटीचे २०८३ रुपयांचा समावेश आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ६५,७८८ रुपये झाला आहे. यामध्ये जीएसटीच्या १९१६ रुपयांचा समावेश आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत १,५६८ रुपयांच्या जीएसटीसह ५३,८६५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचा नफा अद्याप यात समाविष्ट केलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८२,७१६ रुपयांवर पोहोचला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढत आहे. जागतिक पातळीवरील तणावाची स्थिती देखील यास कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.