मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीही वधारली, पहा आजचे दर

Gold Silver price today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीही वधारली, पहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 16, 2023 09:14 AM IST

Gold Silver price today : नवीन वर्ष २०२३ च्या तिसऱ्या व्यावहारिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. लग्नसराईनिमित्त सोने खरेदी कऱण्याचा इरादा असेल तर आजच्या सोने चांदीच्या किंमती इथे चेक करा -

gold silver HT
gold silver HT

Gold Silver price today : नवीन वर्ष २०२३ च्या तिसऱ्या व्यावहारिक आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. आज तुम्हीही स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सध्या सोन्याच्या किंमती सर्वकालीन उच्चांकावर आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोने ८७५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २२७ रुपयांनी महागली होती.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

वास्तविक, आजपासून नवीन व्यावसायिक आठवड्याची सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, शेवटच्या व्यावहारिक आठवड्यात सराफा बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. आज सकाळी जाहीर झालेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतींनुसार सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी अंदाजे ५२१६० रुपये प्रती तोळा आहेत. तर २४ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमती अंदाजे ५६९९० रुपये प्रती तोळा आहेत. चांदीच्या किंमतींबाबतही आज ७२७५० रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत.

सोने खरेदीसाठी हीच संधी

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते १५ जानेवारीला मकर संक्रांतीनंतर देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा आगामी काळातही कायम राहणार आहे. तसेच, यावर्षी २०२३ मध्ये सोन्याचे भाव चढेच राहतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातील लग्नकार्यासाठी अथवा गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीन किंमत जाणून घ्या

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर जाणून घेता येतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

शहर सोने २२ कॅरेट (रु.प्रती तोळा)सोने २४ कॅरेट (रु.प्रती तोळा)चांदी (रु.प्रती किलो)
चेन्नई५२९७०५७७८०७४०००
मुंबई५२०१०५६७४०७२७५०
नवी दिल्ली५२१६०५६९९०७२७५०
कोलकाता५२०१०५६७४०७२७००
बंगळूरु५२०६०५६७९०७४०००
हैदराबाद५२०१०५६७४०७४०००
केरळ५२०१०५६७४०७४०००
पुणे५२०१०५६७४०७२७५०
बडोदा५२०६०५६७९०७२७५०

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग