मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Rate Today: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, गाठला आतापर्यंतचा उच्चांक, जाणून घ्या आजचा भाव

Gold Rate Today: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, गाठला आतापर्यंतचा उच्चांक, जाणून घ्या आजचा भाव

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2023 07:06 PM IST

Gold Price: राज्य कर आणि उत्पादन शुल्कामुळं सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीत सातत्याने बदल होत असतात.

Gold Rate Today
Gold Rate Today

Gold Rate Today, 13 January: लग्नाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आज शुक्रवारी (१३ जानेवारी) सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात आज १५७ रुपयांनी वाढ झाली असून हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. २०२० मध्ये १० ग्रॅम सोन्याचे दर ५६ हजार २४५ पर्यंत पोहचले होते. सोन्याच्या दराने शुक्रवारी आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला. आजचा १० ग्रॅम सोन्याची किंमत ५६ हजार २५४ इतकी आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

आयबीजेएच्या बेवासाईटनुसार, चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदी एक किलोग्रॅममागे ११५ रुपयांनी स्वस्त झाली. एक किलो चांदी आज ६७ हजार ८७८ रुपयांनी विकली जात आहे. सोन्याने गेल्या दोन महिन्यातील नीचांकी पातळी गाठली होती. पण त्यानंतर पुन्हा सोन्याच्या भावात वाढ होत गेली.

देशातील प्रमुख शहरांपैकी चेन्नईत 22 कॅरेट सोनं ५२ हजार ५०० रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत ५७ हजार २५० रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव ५६ हजार ४४० रुपये इतका आहे. तर, कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा दर ५६ हजार २९० रुपये इतका आहे.मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत ५६ हजार २९० रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची?

२४ कॅरेट व्यतिरीक्त २२ आणि १८ कॅरेटमध्येही सोन्याची विक्री केली जाते. कॅरेटनुसार सोन्याच्या किंमतीतही फरक पडतो. महत्वाचे म्हणजे, दागिन्यांसाठी मात्र २२ कॅरेट सोनंच सर्वसाधारणपणे वापरलं जातं. २४ कॅरेट, हॉलमार्क आणि ९९९ हा अंक असणारं सोनं सर्वात जास्त शुध्द सोनं असते. २३ कॅरेट सोन्यात ९५८, २२ कॅरेट सोन्यात ९१६, २१ कॅरेट सोन्यात ८७५ आणि १८ कॅरेट सोन्यात ७५० अंक तुम्हाला लिहिला जातो.

WhatsApp channel

विभाग