मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : सोन्याच्या किंमती सर्वकालीन उच्चांकावर, चांदीही वधारली

Gold Silver price today : सोन्याच्या किंमती सर्वकालीन उच्चांकावर, चांदीही वधारली

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 10, 2023 08:52 AM IST

Gold Silver price today : मंदीची भिती आणि डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्याची झळाळी वाढत आहे. देशांतर्गत बाजारात एमसीएक्सवर सोन्याने ५६ हजारांच्या पुढे सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव ७३३ रुपयांनी वाढून ५६३८० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

Gold Price_HT
Gold Price_HT

Gold Silver price today : मंदीची भिती आणि डाॅलर्समधील घट यामुळे सोन्याची चमक वाढत आहे. मुंबई सराफा बाजारात सोन्याच्या दरात ७३३ रुपयांची आणि चांदीच्या दरात १,०१२ रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, या तेजीमुळे मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६३८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात तो ५५६४७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीच्या वाढीनंतर ६९,८३४ रुपये प्रति किलो झाला. गेल्या आठवड्यात तो ६८,८२२ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

एमसीएक्सवर ५६००० सोने

येथे देशांतर्गत बाजारात, एमसीएक्सवर सोन्याची बंद किंमत ५५९०० रुपये प्रति दहा ग्रॅम होती. व्यवसायादरम्यान तो ५६१७५ रुपये प्रति दहा ग्रॅमवरही पोहोचला होता. चांदीचा बंद भाव ६८९८० रुपये प्रति किलो होता. व्यवसायादरम्यान तो ६९,८३५ रुपये किलोवर पोहोचला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत ८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्याची चमक वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सध्या १८७५ डॉलर प्रति औंस आहे. सोमवारी व्यापारादरम्यान त्याने १८८० डाॅलर्सचा स्तरही ओलांडला होता. डॉलर निर्देशांक १०३ च्या खाली घसरला, जो सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे.

फेड चीफचे विधान

फेडरल रिझर्व्ह फेब्रुवारीमध्ये व्याजदरात २५ बेसिस पाॅईंट्सची वाढ करेल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत सोन्याकडे असलेले आकर्षण आणखी वाढेल. आज फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल स्टॉकहोममधील सेंट्रल बँक परिषदेत बोलतील. त्याच्या विधानांवर बाजाराची नजर असेल.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

आयबीजेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६२६ रुपये प्रति ग्रॅम होता. २२ कॅरेटचा भाव ५४९१ रुपये आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग