आज (८ एप्रिल) रोजी सोन्या-चांदीच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला. एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४४० रुपये म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी वधारून ७१, ०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. डॉलर निर्देशांक (डीएक्सवाय) १०४.२५ च्या जवळपास घसरल्याने चांदी वायदा दर ८२,०६४ रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात १०७६ रुपयांनी म्हणजेच १.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये त्यात ०.७३ टक्क्यांची घसरण झाली असून गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर जून गोल्ड फ्युचर्स ने ७०,६९९ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांकी दर गाठला.
मुंबईत आज १० ग्रॅम सोन्याचा दर ७१,३५० रुपये आहे. तर काल १० ग्रॅम सोन्याचा दर ७१,६९९ रुपये होता. मुंबईत आज एक किलो चांदीचा दर ८३,४०० रुपये होता. तर काल एक किलो चांदीचा दर ८१,७०० रुपये होता.
दिल्लीत आज दहा ग्रॅम सोन्याचा दर ७१,२१० रुपये आहे. तर काल सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ७२,११८ रुपये होता. दरम्यान, दिल्लीत आजचा चांदीचा भाव ८३,४०० रुपये प्रति किलो होता. काल, ७ एप्रिल रोजी दिल्लीत चांदीचा दर ८१,७०० रुपये प्रति किलो होता.
चेन्नईत आज दहा ग्रॅम सोन्याचा भाव ७१,०७० रुपये आहे. तर काल १० ग्रॅम सोन्याचा दर ७२,११८ रुपये होता. चेन्नईत आज एक किलो चांदीचा दर ८६,९०० रुपये होतो. तर काल चेन्नईक एक किलो चांदीचा दर ८५ हजार रुपये होता.
कोलकाता शहरात आज प्रती दहा ग्रॅम सोन्याचे दर ७१,६२९ रुपये होते. तर काल, ७ एप्रिल रोजी १० ग्रॅम सोन्याचे दर ७१,४८९ रुपये ग्रॅम होता. कोलकात्यात एक किलो चांदीचा दर ८३,४०० रुपये होता. तर काल प्रती किलो चांदीचा दर ८१, ७०० रुपये होता.
सोने या धातूमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भविष्यातला एक ठेवा म्हणून लोक सोन्याकडे पाहत असतात. सध्याच्या काळात बाजारात गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध असले तरी सोन्याच्या गुंतवणुकीत यत्किंचितही कमी झालेली दिसत नाही. परिणामी सोने आणि चांदीचे दर सतत वाढत असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या