Gold Silver Price Today : लगीनसराईमुळं मागचे काही दिवस सातत्यानं वधारणाऱ्या व नवा उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरात आज (शुक्रवार, २२ मार्च) मोठी घसरण झाली. सोन्याच्या पाठोपाठ चांदीचा दरही घसरला. पाहूया काय आहेत आजचे दर…
२४ कॅरेट सोनं ६६९ रुपयांनी स्वस्त होऊन ६६,२४५ रुपयांवर आलं आहे. गुरुवारी हाच दर ६६,९६८ रुपये होता. आता २३ कॅरेट सोन्याची किंमत ६६६ रुपयांनी स्वस्त होऊन ६५,९८० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६१३ रुपयांनी घसरून ६०६८० रुपयांवर आला आहे. १८ कॅरेटचा दर आता ४९,६८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज त्यात ५०३ रुपयांची घसरण झाली आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा दर ३९२ रुपयांनी कमी होऊन तोळ्यामागे ३८,७५३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदी किलोमागे १,२५८ रुपयांनी स्वस्त होऊन ७५,०४५ रुपये झाली आहे.
सोन्याच्या किंमतीनं मार्च महिन्यात ५ वेळा नवा उच्चांक गाठला. या महिन्यात ५ मार्च २०२४ रोजी सोन्याचा दर प्रथम ६४,५९८ रुपयांवर पोहोचला होता. दोन दिवसांनंतर ७ मार्चला तो ६५,०४९ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर ११ मार्च रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ६५,६४६ रुपये झाला. हा नवा उच्चांक होता. आज, २२ मार्चला हा दर ६६९६८ रुपयांवर पोहोचला होता.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव तोळ्यामागे ६६,९३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६१,३५० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ५०,१९० रुपये आहे. मुंबईत चांदीचा आजचा भाव किलोमागे ७६,५०० रुपये आहे.
सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जारी केले आहेत. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचे शुल्क लागू नाही. त्यामुळं तुमच्या शहरात सोने-चांदी १००० ते २००० रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे.
इंडियनं बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशन ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. IBJA दिवसातून दोनदा, दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. हे दर अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सार्वभौम रोखे जारी करण्यासाठी बेंचमार्क असतात. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालयं आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहेत.