मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price today : सोने पोहोचले ७० हजारांवर, चांदीची चमकही वाढली! आजचा भाव किती?

Gold Silver Price today : सोने पोहोचले ७० हजारांवर, चांदीची चमकही वाढली! आजचा भाव किती?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 04, 2024 02:59 PM IST

Gold Silver Price Today : देशभरात लगीनघाई सुरू असतानाच सोने व चांदीचे दर वाढत आहेत. सोन्याचा भाव जवळपास ७० हजारांवर पोहोचला आहे.

सोने पोहोचले ७० हजारच्या जवळ, चांदी ८० हजारांवर; सोन्याचा आजचा भाव किती?
सोने पोहोचले ७० हजारच्या जवळ, चांदी ८० हजारांवर; सोन्याचा आजचा भाव किती?

Gold Silver Price news Today : देशभरात सध्या लग्नांचा मोसम सुरू असून त्यामुळं सोने व चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम किंमतीवर झाला असून सराफा बाजारात सोन्याच्या सरासरी भावानं नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा भाव आज ७० हजारच्या जवळ पोहोचला आहे. तर, चांदी किलोमागे ८० हजार रुपये झाली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९९३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​खुला झाला. हा सोन्याच्या भावाचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. बुधवारी, म्हणजे कालच सोन्याच्या दरानं ६९,५२६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर, चांदी ७७,६६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. चांदीच्या दराचाही हा आजवरचा उच्चांक आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर आज ५७२ रुपयांनी वाढून ६९९३६ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव १४६९ रुपयांनी वाढला आहे. आयबीजेएनं जारी केलेल्या दरानुसार, आता २३ कॅरेट सोनं ६९६५६ रुपये दरानं खुलं आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे ६४०६१ रुपये झाला आहे. तर, १८ कॅरेट सोन्याचा भाव ५२३५२ रुपयांवर पोहोचला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४०९१३ रुपये झाला आहे. यात ज्वेलरी मेकिंग आणि जीएसटीचा समावेश नसल्यानं प्रत्येक शहरात हा दर वेगळा असू शकतो.

मुंबईत सोने ७० हजार पार

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव आज ७०,४७० रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत त्यात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर तोळ्याला ६४,६०० रुपये आहे. काल हाच भाव ६४,१०० रुपये होता. १८ कॅरेट सोन्याची किंमत दर दहा ग्रॅममागे ४१० रुपयांनी वाढून ५२,८५० रुपये झाली आहे. मुंबईत चांदीचा भाव किलोमागे ८२००० रुपयांवर पोहोचला आहे.

का वाढतोय सोन्याचा दर?

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, सोन्याच्या वाढत्या किमतीमागे जगभरच्या विविध देशातील केंद्रीय बँका आहे. फेब्रुवारी महिन्यात जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या साठ्यात १९ टनांची वाढ झाली असून. सलग नवव्या महिन्यात ही वाढ झाली आहे.

WhatsApp channel

विभाग