Gold Silver Rates Today 1 August 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सीमा शुल्कामध्ये कपात करण्याची घोषणा केल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमतीना लागलेली घसरण आता थांबली आहे. आजही सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. मागच्या चार दिवसांत दोन्ही धातूंचा भाव १ हजारहून अधिक वाढला आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ५९६ रुपयांनी वाढून ६९९०५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा भाव ५६८ रुपयांनी वाढून ८३५४२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ दिवसांत सोन्याच्या दरात ११११ रुपयांनी तर चांदीच्या दरात १३५० रुपयांची वाढ झाली आहे.
IBJA ने जारी केलेल्या दरानुसार, आज २३ कॅरेट सोन्याची किंमत ५९४ रुपयांनी वाढून ६९,६२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. त्याचवेळी २२ कॅरेट सोन्याचा भावही ५४६ रुपये प्रति १० ग्रॅमनं वाढून ६४,०३३ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडं, १८ कॅरेट सोन्याचा भाव ४४७ रुपयांनी वाढून तोळ्यामागे ५२,४२९ रुपये झाला आहे. आज १४ कॅरेट सोन्याचा भाव ३४८ रुपयांनी वाढून ४०,८९४ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, तांत्रिक सेटअप आणि कप आणि हँडल पॅटर्नचा विचार करता, सोनं प्रति औंस २७०० डॉलरपर्यंत जाऊ शकतं. दीर्घ कालावधीचा विचार करता सोन्यात तेजी अपेक्षित आहे. याचाच अर्थ येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात सोनं ७७ हजार ते ७७,५०० पर्यंत पोहोचू शकतं. कारण, जगभरातील केंद्रीय बँका सोन्याची खरेदी सुरू ठेवत आहेत. भू-राजकीय तणाव कायम आहे. आता इस्रायल आणि इराणमधील तणाव सोन्याच्या किमतीला अनुकूल ठरत आहे.
३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत आता ७२००२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. त्याच वेळी, जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७१३ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,९५३ रुपयांवर पोहोचली आहे. जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४००१ रुपये आहे. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचा नफा यात समाविष्ट केलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ८६,०४८ रुपयांवर पोहोचला आहे.
संबंधित बातम्या