मराठी बातम्या  /  business  /  Gold Price Hike : सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकाॅर्ड; तोळ्याचा भाव ५७ हजारांपार
Gold price Hike  HT
Gold price Hike HT

Gold Price Hike : सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकाॅर्ड; तोळ्याचा भाव ५७ हजारांपार

25 January 2023, 11:46 ISTKulkarni Rutuja Sudeep

Gold Price Hike : जागतिक आर्थिक मंदीचे संकेत आता मिळू लागले आहेत. जागतिक पातळीवर डाॅलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतींनी उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.

Gold Price Hike : जागतिक आर्थिक मंदीचे संकेत आता मिळू लागले आहेत. जागतिक पातळीवर डाॅलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतींनी उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मंगळवारी बाजारबंद होतेवेळी सोन्याच्या किंमतींनी ५७ हजार प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला, याआधी ऑगस्ट २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात सोन्याच्या दराने ५६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला होता. त्याच्या तुलनेत त्यापेक्षा 800 अधिक आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर ५७३६२ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर उघडला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो ५७०४४ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा दर ३१८ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला. २० जानेवारी २०२३ रोजी सोन्याने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव ५७०५० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत तब्बल २५ टक्के घट झाली आहे. ज्या कुटुंबात लग्नसराई आहेत त्यांच्याकडेच सोने खरेदीचा कल आहे. गेल्या वर्षी दिवाळीपासून सोन्याचे दर १४ टक्क्यांनी वाढले आहेत. किमतीत अचानक वाढ झाल्यामुळे साध्या ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोन्यावरील आयातशुल्क सध्या १५ टक्के आहे. आगामी अर्थसंकल्पात हे आयातशुल्क कमी करावे अशी मागणी सराफा उद्योग संघटनेने केली आहे. कारण यामुळे मागणी वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

विभाग