Gold and Silver Price: लग्नसराई चालू झाली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आता जागतिक पातळीवर बदललेल्या परिस्थितीमुळे भारतात सोने आणि चांदीचा दर घसरला आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणाच्या विचार करत असलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या भावात ५ हजार ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ७४ हजार ५०० रुपयांपर्यत खाली आला होता. तर, चांदी ११ हजार रुपयांनी स्वस्त झाली. दरम्यान, ३० ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत सोने- चांदीचा भाव किती होता? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
३० ऑक्टोबर: सोने- ८० हजार २०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- १ लाख रुपये (प्रतिकिलो)
५ नोव्हेंबर: सोने- ७९ हजार ४०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९५ हजार ५०० रुपये (प्रतिकिलो)
११ नोव्हेंबर: सोने- ७७ हजार ३०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९१ हजार ८०० रुपये (प्रतिकिलो)
१२ नोव्हेंबर: सोने- ७५ हजार ८०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९० हजार ५०० रुपये (प्रतिकिलो)
१३ नोव्हेंबर: सोने-७५ हजार ६०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ९० हजार ८०० रुपये (प्रतिकिलो)
१४ नोव्हेंबर: सोने- ७४ हजार ५०० रुपये (प्रति १० ग्रॅम), चांदी- ८९ हजार रुपये (प्रतिकिलो)
सोन्याचा ताजा भाव जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ८९५५६६४४३३ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकतात. या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये सोन्याचे ताजे दर दाखवले जातील.
सोन्यावरील हॉलमार्क तपासण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे बीआयएस केअर (BIS Care) नावाचे एक अॅप आहे. या अॅपच्या ग्राहक दागिन्यांची शुद्धता तपासू शकतात. यासाठी ग्राहकांना व्हेरिफाय एचयूआयटी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर दागिन्यांवर असलेला एचयूआयडी नंबर टाकावा. त्यानंतर दागिन्यांची सर्व माहिती उपलब्ध आहे.
दरम्यान, २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा असतो. २२ कॅरेट दागिन्यात ९१.६६ टक्के सोने असते. १८ कॅरेट सोन्यात ७५ टक्के सोने असेल. १४ कॅरेट दागिन्यात ५८.१ टक्के सोने असते.