मराठी बातम्या  /  बिझनेस  /  gold silver price : सोने ७० हजारांवर जाण्याची शक्यता; आजचा तोळ्याचा भाव किती?

gold silver price : सोने ७० हजारांवर जाण्याची शक्यता; आजचा तोळ्याचा भाव किती?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 01, 2024 01:26 PM IST

Gold Price Prediction : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणारा सोन्याचा भाव लवकरच ७० हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज आहे.

सोने ७० हजारांवर जाण्याची शक्यता; आजचा तोळ्याचा भाव किती?
सोने ७० हजारांवर जाण्याची शक्यता; आजचा तोळ्याचा भाव किती?

Gold Silver Price news : गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, आज कमॉडिटी मार्केटमध्ये (MCX) सोन्याच्या दरानं ६८,८३० रुपयांची पातळी ओलांडत नवा इतिहास रचला आहे. तर, चांदीचा दर ७५,६९२ वर पोहोचला आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सोनं ७० हजारावर जाईल, असा अंदाज आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

मध्य आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि यूएस फेडच्या व्याजदरांबाबत मवाळ भूमिका यामुळं आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीनं प्रति औंस २,२५९ डॉलरचा नवा उच्चांक गाठला आहे. 

MCX वर आज सकाळी ९.३० च्या सुमारास, ५ जूनसाठी २२ कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत १.७९ टक्क्यांच्या वाढीसह ६८,९१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करत होती. तर, ३ मे रोजीचा चांदीचा वायदा भाव सुमारे एक टक्क्यानं वाढून ७५,७८० रुपये प्रति किलो होता.

बाजार तज्ज्ञ म्हणतात…

केडिया अ‍ॅडवायजरीचे अध्यक्ष अजय केडिया यांनी सोन्याच्या सध्याच्या दरावर भाष्य केलं. 'सोनं प्रति दहा ग्रॅमला ७०,००० रुपयांपर्यंत पोहोचेल, असं केडिया म्हणाले. मागील वर्षीच्या दिवाळीसाठी आम्ही व्यक्त केलेला सोन्याच्या दराचा अंदाज खरा ठरला. इतकंच नव्हे, आम्ही सुचवलेल्या दराच्या म्हणजेच, ५९५०० च्या पातळीपासून १४.२८ टक्के अधिक वाढला.

मुंबईतील सोन्याचा भाव

मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भावात आज ९३० रुपयांची वाढ झाली असून सोनं तोळ्यामागे ६९,३८० रुपयांवर पोहोचलं आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्याला (प्रति १० ग्रॅम) ६३,६०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ५२,०४० रुपये आहे.

चांदीच्या भावातही आज वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ७८,६०० रुपये झाला आहे. काल एक किलो चांदीची किंमत ७८,००० रुपये होती.

WhatsApp channel

विभाग