मराठी बातम्या  /  business  /  ATM Gold : एटीएममधून आता सोनंही मिळणार; भारतातील 'या' शहरात सुरू झालं पहिलं गोल्ड एटीएम
ATM HT
ATM HT

ATM Gold : एटीएममधून आता सोनंही मिळणार; भारतातील 'या' शहरात सुरू झालं पहिलं गोल्ड एटीएम

06 December 2022, 13:29 ISTKulkarni Rutuja Sudeep

ATM Gold : एटीएम म्हणजे एनी टाईम मनी हे सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनाशी निगडित असलेलं समीकरण. पण आता याच एटीएममधून तुम्हाला कुठल्याही वेळी पैशासोबत सोने खरेदी करता आलं तर… ! विश्वास नाही बसणार, पण हा प्रायोगिक प्रकल्प या शहरात सुरु झाला आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा -

ATM Gold : जगातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. हे संपूर्ण जगातील पहिले रिअल टाईम एटीएम आहे. गोल्ड सिक्काच्या या एटीएमचा वापर करणे सहजसुलभ असून ते २४*७ ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. या गोल्ड एटीएमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या द्वारेही सोने खरेदी करु शकता.

ट्रेंडिंग न्यूज

हे दुसऱ्या एखाद्या एटीएमप्रमाणेच काम करते. एटीएममधून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला डेबिट अथवा क्रेडिट कार्डाची गरज असते. यानंतर एटीएमवर सोने खरेदीसाठी दिलेल्या पर्यायांची निवड करावी लागते. आजचे सोन्यांचे दर तपासल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे सोने खरेदी या एटीएममधून करता येते. गोल्डसिक्काच्या ट्विटरवर या गोल्ड एटीएमच्या दाखलीकरणाची माहिती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.

गोल्डसिक्काने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, या एटीएममधून खरेदी करण्यात येणारे सोने हे २४ कॅरेट्स आहे. यात अर्धा ग्रॅमपासून ते १०० ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी खरेदी करता येणार आहेत.

सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

विभाग