Gold Silver Price today 17 june 2024 : लगीनसराई संपल्याचा परिणाम सध्या सोने व चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज किरकोळ घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०३ रुपयांनी घसरून ७३६६.३० रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६१ रुपयांनी घसरून ६७४७.५ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे.
गेल्या आठवडाभरात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत -०.९६ टक्के बदल झाला आहे. तर गेल्या महिन्यात तो २.२१ टक्के झाला आहे. चांदीची किंमत ९० रुपयांनी वाढून ८८,१०० रुपये प्रति किलो आहे.
मुंबईत कालच्या तुलनेत सोनं आज स्वस्त झालं आहे. सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ७३८०६ रुपये आहे. काल सोन्याचा भाव तोळ्यामागे ७३९५० रुपये होता. तर, गेल्या आठवड्यात ११ जून रोजी हाच दर ७२,८८४ रुपये होता.
मुंबईत आज चांदीचा भाव ८८,१०० रुपये प्रति किलो ग्रॅम आहे. काल हाच दर ८८,०१० रुपये प्रति किलो होता आणि मागील आठवड्यातील ११ जून रोजी चांदीचा भाव ८९,११० रुपये प्रति किलो होता.
मुंबईच्या तुलतेन दिल्लीत आज सोन्याचा भाव कमी आहे. दिल्लीत आज सोनं तोळ्यामागे ७३६६३ रुपये आहे. रविवारी हाच ७३,७३५ रुपये होता.
दिल्लीत आज चांदीचा भाव ८८,१०० रुपये प्रति किलो ग्रॅम आहे. कालचा चांदीचा दर ८८०१० रुपये प्रति किलो होता. मागील आठवड्यात हाच दर ८९,११० रुपये प्रति किलो होता.
चेन्नईमध्ये आज सोन्याचा भाव ७३१६० प्रति दहा ग्रॅम आहे. काल हाच भाव ७३,८०६ रुपये होता. तर, चांदीचा भाव चेन्नईत आज ८८,१०० रुपये प्रति किलो आहे. काल तो ८८,०१० रुपये प्रति किलो होता.
कोलकात्यात आज सोन्याचा भाव तोळ्यामागे ७३०१६ रुपये आहे. काल हाच भाव तोळ्यामागे ७३,०८८ रुपये होता. कोलकात्यात चांदीचा भाव आज मुंबई, चेन्नई व दिल्ली इतकाच आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांवर अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यात प्रतिष्ठित ज्वेलर्सच्या इनपुटचाही समावेश आहे. सोन्याची जगभरातील मागणी, विविध देशांच्या चलनमूल्यातील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी या बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतींवर परिणाम होतो.
संबंधित बातम्या