मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gokul Milk price Hike : महागाईला उकळी! गोकुळ दूधाच्या दरात ३ रुपयांची वाढ

Gokul Milk price Hike : महागाईला उकळी! गोकुळ दूधाच्या दरात ३ रुपयांची वाढ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 06, 2022 12:20 PM IST

Gokul Milk price Hike : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे.

Gokul milk HT
Gokul milk HT

Gokul Milk price Hike : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ने दूधाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. 

गोकुळच्या गाईच्या दूधात ३ रुपये वाढ झाली आहे. आता किंमत प्रतिलीटर ५४ रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला थेट दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. गेल्या वर्षभरात गोकूळच्या दुधात आतापर्यंत ४ वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गोकूळच्या फूल क्रिम दूधाच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

गोकूळ संघातर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे संघामार्फत दिनांक ६ डिसेंबरपासून मुंबई शहर व उपनगरे, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयामध्ये वितरीत होणाऱ्या गोकुळ दुधाच्या ग्राहक किंमतीत नाईलाजास्तव वाढ करण्यात येत असून, सदरचे सुधारीत दर खालीलप्रमाणे राहतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे,अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी त्याचा भार आता ग्राहकांवर पडला आहे. 

 

 

WhatsApp channel

विभाग