Godrej-Raymond deal : गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने गुरुवारी सांगितले की, रेमंड कंझ्युमर केअर लिमिटेड (RCCL) चा फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) व्यवसाय घेण्यासाठी करार केला आहे.या कराराचे मूल्य २८२५ कोटी रुपये आहे.
रेमंड कंझ्युमर केअर ही कंपनी डिओडोरंट्स आणि कन्डोम श्रेणींमध्ये आघाडीवर असल्याचे म्हटले जाते. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने आज जारी केलेल्या निवेदनानुसाप, आरसीसीएल पार्क अव्हेन्यू, केएस, कामसूत्र आणि प्रीमियमसारख्या ब्रँडेड उत्पादनांचा व्यवसाय विकत आहे. हा करार स्टॅकच्या स्वरूपात केला जाणार आहे. त्यानुसार वेगवेगळ्या ब्रँड्सचे मूल्य एकत्रित करुन एकरकमी कराराची रक्कम निश्चित केली जाईल.
जीपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, सुधीर सीतापती म्हणाले, “या संपादनामुळे आम्हाला आमच्या व्यवसाय पोर्टफोलिओ आणि वाढीच्या धोरणातील अंतर भरून काढण्याची संधी मिळाली आहे. भारतातील डिओडोरंटचा दरडोई वापर डॉलरच्या बाबतीत इंडोनेशियाच्या ४० टक्के, ब्राझीलच्या ५ टक्के आणि अमेरिकेच्या ४ टक्के इतका आहे.
रेमंड ग्रुपचे ग्रुप व्हाईस चेअरमन अतुल सिंग म्हणाले, “आम्ही पार्क अव्हेन्यू, कामसूत्र ट्रेडमार्क असलेला आमचा एफएमसीजी व्यवसाय गोदरेज ग्राहक उत्पादनांना विकण्याचा निर्णय घेतला.कारण आम्हाला विश्वास आहे की गोदरेज ग्राहक उत्पादने या ब्रँड्सच्या वाढीस चालना देण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण देतील.
संबंधित बातम्या