गोदरेज होम लॉकर्सची नवीन श्रेणी दाखल; डिजिटल आणि बायोमेट्रिक पद्धतीने उघडा लॉकरचं दार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गोदरेज होम लॉकर्सची नवीन श्रेणी दाखल; डिजिटल आणि बायोमेट्रिक पद्धतीने उघडा लॉकरचं दार

गोदरेज होम लॉकर्सची नवीन श्रेणी दाखल; डिजिटल आणि बायोमेट्रिक पद्धतीने उघडा लॉकरचं दार

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 28, 2025 01:09 PM IST

गोदरेज उद्योग समूहाच्या सिक्युरिटी सोल्युशन्स विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाधारित होम लॉकर्सची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता लॉकर उघडण्यासाठी डिजिटल आणि बायोमेट्रिक अशी दुहेरी प्रवेश यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोदरेज होम लॉकर्सची नवीन उत्पादने बाजारात
गोदरेज होम लॉकर्सची नवीन उत्पादने बाजारात

गोदरेज उद्योग समूहाच्या सिक्युरिटी सोल्युशन्स विभागाने उच्च दर्जाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित होम लॉकर्सची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे. उत्तम सुरक्षेसह सुंदर रचना हे या नवीन लॉकर उत्पादनांचे एक वैशिष्ट्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

गोदरेज कंपनीद्वारे होम लॉकर्सच्या नव्याने लॉन्च केलेल्या रेंजमध्ये एनएक्स प्रो स्लाइड (NX Pro Slide), एनएक्स प्रो लक्स (NX Pro Luxe), रिनो रिगल (Rhino Regal) आणि एनएक्स सिल (NX Seal) या लॉकर्सचा समावेश आहे. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेता या उत्पादनांमध्ये लॉकर उघडण्यासाठी डिजिटल आणि बायोमेट्रिक अशी दुहेरी प्रवेश यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय इंटेलिजेंट इबझ अलार्म यंत्रणा, भरपूर स्टोरेज आणि आधुनिक घराच्या सौंदर्यशास्त्राशी जुळणारे आकर्षक इंटिरियर हे वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त मौल्यवान दागिने जपून ठेवण्यासाठी गोदरेज कंपनीने डिफेंडर ऑरम प्रो रॉयल क्लास ई सेफ देखील लॉन्च केले आहे. हे लॉकर BIS-प्रमाणित असून उच्च दर्जाचे सुरक्षित लॉकर मानले जाते. जून २०२४ पासून लागू होणाऱ्या नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेशाची यात पूर्तता करण्यात आली आहे. तसेच ज्वेलर्स, बँका आणि हॉलमार्क यांना सोन्याच्या खरेपणाची अचूक चाचणी घेण्यासाठी AccuGold iEDX हे यंत्र तयार करण्यात आले आहे. उच्च दर्जाची सुरक्षितता, सुलभ वाहतूक आणि सेटअप साठी गोदरेजने ‘एमएक्स पोर्टेबल स्ट्राँग रूम मॉड्युलर पॅनेल्स’  तयार केले आहे.

नवीन उत्पादनांविषयी बोलताना गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्सचे बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले, ‘गोदरेज सेक्युरिटी हा तब्बल एक शतकाहून अधिक काळ भारतातील घराघरात पसंतीचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. घरांमध्ये होणाऱ्या विविध बदलांसह आणि विकसित होणाऱ्या नवनवीन गरजांसह आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये बदल करत आहोत. आमच्या होम लॉकर्सच्या नवीन श्रेणीसह ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध वैशिष्ट्यांसह, मजबूत सुरक्षा आणि प्रशस्त डिझाइनसह सुसज्ज लॉकर्सची नवीन श्रेणी दाखल करत आहोत. आमचा ब्रँड आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही टियर 2 मार्केटसाठी लॉकर देखील लॉन्च केले आहेत. मार्केटमध्ये सातत्याने आघाडीवर राहण्यासाठी आम्ही सतत नवीन तंत्रज्ञान भागीदारी आणि गुंतवणूक शोधत आहोत. प्रगत सुरक्षा उत्पादने आणि उपायांचा एक मजबूत पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांत लक्षणीय गुंतवणूक केली आहे. होम लॉकर श्रेणीमध्ये आम्ही सातत्याने आघाडीवर आहोत. चालू आर्थिक वर्षात या श्रेणीतील जवळपास ७० टक्के बाजारपेठ विस्तार करण्याचे आमचे ध्येय आहे.'

घरे, संस्था, बँकिंग, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरक्षा उपायांचा सर्वसमावेशक संच ऑफर करणारी कंपनी म्हणून गोदरेज प्रसिद्ध आहे. दरम्यान, देशात टायर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये या उत्पादनांची विक्री करण्याचे गोदरेजने लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय जगातील ४५ हून अधिक देशांमध्ये ही उत्पादने विकली जात आहेत.

Whats_app_banner