मराठी बातम्या  /  बिझनेस  /  GO first Airline : गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांना टाटाचा सहारा! एअर इंडियामध्ये नवी संधी

GO first Airline : गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांना टाटाचा सहारा! एअर इंडियामध्ये नवी संधी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 05, 2023 03:22 PM IST

GO first Airline : यादरम्यान, एनसीएलटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या द्विसदस्यीय समितीने दिवसभर चाललेल्या सुनावणीदरम्यान आपला निर्णय राखून ठेवला आहे.

Go First HT
Go First HT

GO first Airline : स्वैच्छिक दिवाळखोरी घोषित करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील एअरलाईन गो फर्स्ट (Go first Airlines) एअरलाईन्सच्या ५००० कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांना टाटांच्या एअर इंडिया कंपनीने चांगली संधी दिली आहे. वास्तविक, एअर इंडियाने मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधीची जाहीरात काढली आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये वाॅक इन इन्टरव्ह्यूचे आयोजन केले आहे.

या इन्टरव्ह्यूमध्ये गो फर्स्टच्या पायलट्ससहित अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. न्यूज एजन्सीच्या माध्यमातून एअर इंडियाच्या वाॅक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी पायलट्स म्हणाले की, त्यांना फ्लाईंग लायसेन्सेस पुढे चालू ठेवण्यासाठी नोकरीची गरज आहे. तत्पुर्वी गो फर्स्टच्या सीईओने म्हटले होते की, एअरलाईन्स आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबद्ध आहे आणि कंपनी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एनसीएलटीचे म्हणणे

एनसीएलटीने गो फर्स्टने जाहीर केलेल्या दिवाळखोरीसंदर्भातील निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. एनसीएलटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या द्विसदस्यीय समितीने दिवसभर चाललेल्या सुनावणीदरम्यान आपला निर्णय राखून ठेवला आहे.

गो फर्स्टचे अपील

वाडिया समुहाचे नियंत्रण असलेली गो फर्स्ट एअरलाईन्सने आपल्या याचिकेमध्ये दिवाळखोरी प्रक्रियासंदर्भातील कारवाई सुरु करण्याचे अपील केले आहे. याशिवाय एअरलाईन्सने आपल्या आर्थिक व्यवहारांवर रोख लावण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, गो फर्स्टने आपला विमान प्रवास ९ मे पर्यंत बंद केला आहे. त्यासह १५ मे पर्यंत तिकीटविक्रीदेखील बंद केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग