Multibagger Stock : जेनेसिस इंटरनॅशनलचा (Genesis International share price) शेअर मंगळवारी ९ टक्क्यांनी वधारून ८९३.२० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरने वर्षभरात १७१ टक्के परतावा दिला आहे. तर, चार वर्षांत कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
वर्षभरापूर्वी या शेअरचा भाव ३१५ रुपये होता. दीर्घ मुदतीत या शेअरनं गेल्या चार वर्षांत १,९६३ टक्के आश्चर्यकारक परतावा दिला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं या कालावधीत १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती तर ही रक्कम वाढून २०.६३ लाख रुपये झाली असती. या वर्षी आतापर्यंत हा शेअर ११० टक्क्यांनी वधारला आहे. दीर्घ काळासाठी हा शेअर २९ रुपयांवरून सध्याच्या किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत त्यात २९०० टक्के वाढ झाली आहे.
या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. झपाट्यानं होणारं नागरीकरण, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प आणि स्मार्ट सिटी मिशनसारख्या सरकारी उपक्रमांमुळं भारताच्या विस्तारत्या भूस्थानिक बाजारपेठेचा लाभ उठविण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एलारा कॅपिटलच्या माहितीनुसार, थ्रीडी डिजिटल ट्विन्स आणि हाय-डेफिनेशन मॅप्स सारख्या नाविन्यपूर्ण ऑफर्समुळं कंपनी भारताच्या २९३ अब्ज रुपयांच्या (३.५ अब्ज अमेरिकन रुपये) भूस्थानिक बाजारपेठेत महत्त्वपूर्ण वाटा मिळविण्यास सज्ज आहे.
एलारा कॅपिटलनं या कंपनीच्या शेअरला 'बाय' रेटिंग दिलं असून टार्गेट प्राइस १,३७० रुपये ठेवली आहे. ही टार्गेट प्राइस पाहता हा शेअर सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा ५३ टक्क्यांनी वधारण्याची अपेक्षा आहे.
मजबूत ऑर्डर बुक आणि सरकारी आणि खासगी करारांमधील धोरणात्मक स्थितीच्या आधारे आर्थिक वर्ष २०२४-२७ ई दरम्यान ५३.९ टक्के महसूल सीएजीआर अपेक्षित आहे. एनएसईच्या आकडेवारीनुसार, जेनेसिस इंटरनॅशनलचं मार्केट कॅप ३,४८५.९१ कोटी रुपये आहे.