Adani Wedding: मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदानी करणार १०,००० कोटींचे दान, सर्वाधिक पैसा ‘या’ क्षेत्रासाठी वापरला जाणार!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Wedding: मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदानी करणार १०,००० कोटींचे दान, सर्वाधिक पैसा ‘या’ क्षेत्रासाठी वापरला जाणार!

Adani Wedding: मुलाच्या विवाहानिमित्त गौतम अदानी करणार १०,००० कोटींचे दान, सर्वाधिक पैसा ‘या’ क्षेत्रासाठी वापरला जाणार!

Updated Feb 07, 2025 11:50 PM IST

Gautam Adani : अहमदाबादच्या अदानी शांतीग्राम टाऊनशिपमध्ये शुक्रवारी जीत अदानी हिरे व्यापारी जैमीन शाह यांची मुलगी दिवासोबत विवाहबंधनात अडकला. यानिमित्त गौतम अदानी यांनी सामाजिक कार्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे दान करणाची घोषणा केली.

गौतम अदानी यांनी ट्विट केलेला लग्न सोहळ्यातील फोटो
गौतम अदानी यांनी ट्विट केलेला लग्न सोहळ्यातील फोटो

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचा सर्वात लहान मुलगा जीत अदानी याचा विवाह सोहळा  शुक्रवारी साधेपणाने पार पडला. या विवाह समारंभानिमित्त गौतम अदानी यांनी १० हजार कोटी रुपये समाजासाठी दान करण्याची घोषणा केली. जगातील सर्वात धनाड्य व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानींकडून दिलेले हे दान विवध सामाजिक कार्यांसाठी वापरले जाईल. 

गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा विवाह दीवा शहा हिच्याशी झाला. या निमित्त गौतम अदानी यांनी मोठी रक्कम दान करण्याची घोषणा केली.  मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि साधेपणे केला जाईल असे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी कुंभमेळ्यातील भेटीदरम्यान जाहीर केले होते. 

या क्षेत्रात वापरला जाईल पैसा -

अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल. गौतम अदानी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. आरोग्यसेवा,  शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होईल. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडतील अशा दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील उच्च दर्जाच्या K-12 शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील.

अदानींचे खास ट्विट -

मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदानी यांनी खालील प्रमाणे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात झाला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे.

अहमदाबाद मधील अदाणी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लब मध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला. हिरे व्यापारी जैमिन शहा याची दिवा ही कन्या आहे 

जीत अदाणी हा सध्या अदाणी एअरपोर्ट्सचा संचालक आहे. या कंपनीतर्फे सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे. जीत याने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलव्हेनियाज स्कूल ऑफ इंजीनियरिंग अॅप्लाईड सायन्स मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. 

५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाखांची मदत -

या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदाणी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे ५०० विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य पुरवले जाणार आहे. दरवर्षी एवढेच सहाय्य दिले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत याने या उपक्रमाची सुरुवात करताना २१ नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना सहाय्य दिले. 

गौतम आणि प्रीती अदानी यांचा धाकटा मुलगा जीत पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शिक्षण घेतल्यानंतर २०१९ मध्ये अदानी समूहात सामील झाला.  जून २०२० मध्ये, त्यांनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला - आज भारतातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी ज्याच्या व्यवस्थापन आणि विकास पोर्टफोलिओमध्ये आठ विमानतळ आहेत. विमानतळ व्यवसायाव्यतिरिक्त ते अदानी समूहाचे संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसाय पाहतात. ग्रुपच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

त्यांचे मोठे बंधू करण अदानी हे अदानी पोर्ट्स अँड सेझचे (एपीएसईझेड) सीईओ आहेत आणि समूहाच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner