Gautam Adani become Asia's richest person : भारतातील अब्जाधीश गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. अदानी हे ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अडानी हे सध्या १११ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह निर्देशांकात ११ व्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी यांना त्यांनी १०९ अब्ज डॉलर्सला मागे टाकले आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट सध्या २०७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या खालोखाल इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २०३ अब्ज डॉलर्स आणि जेफ बेझोस यांची १९९ अब्ज डॉलर्स आहे.
अडानी ग्रुपचे शेयर वधारल्याने, गौतम अडानी हे शुक्रवारी, जेफरीजच्या अहवालात पुढील दशकात ९० अब्ज डॉलर्स भांडवली खर्चासह समूहाच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांवर प्रकाश टाकल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यांच्या शेयरला बाजाराने अनुकूल प्रतिसाद दिला, ज्यामुळे अदानी समूहाच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान अडानी ग्रुपचे एकूण बाजार भांडवल हे १९.९४ लाख कोटी रुपये झाले. ट्रेडिंग सत्राच्या अखेरीस, बाजार भांडवल १७. ५४ लाख कोटी रुपयांवर वर स्थिरावले होते, ज्यामुळे कंपनीच्या मूल्यामध्ये ८४,०६४ कोटींची वाढ झाली.
हिंडेनबर्ग अहवालातील तपशीलवार आरोपांची चौकशी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०२३ हे वर्ष अदानी समूहासाठी आव्हानात्मक होते. याआधी जागतिक स्तरावर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानींच्या रँकिंगमध्ये घसरण झाली होती. कारण समूहाच्या समभागांची लक्षणीय विक्री झाली होती.
त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाच्या चौकशीला अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश दिले आणि पुढील तपासाची आवश्यकता नाही असे नमूद केले. सेबीने अहवाल दिला की ते त्यांच्या तपासात निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत.