bonus shares : एका शेअरवर ४ शेअर मोफत देण्याची कंपनीची घोषणा, शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bonus shares : एका शेअरवर ४ शेअर मोफत देण्याची कंपनीची घोषणा, शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड

bonus shares : एका शेअरवर ४ शेअर मोफत देण्याची कंपनीची घोषणा, शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड

HT Marathi Desk HT Marathi
Nov 18, 2024 11:58 AM IST

Garware Technical share price : गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडनं गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट दिली आहे. त्यामुळं कंपनीचा शेअर चांगलाच वधारला आहे.

एका शेअरवर ४ शेअर मोफत देण्याची कंपनीची घोषणा, शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड
एका शेअरवर ४ शेअर मोफत देण्याची कंपनीची घोषणा, शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड

Garware technical bonus share news : गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडने प्रथमच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येक शेअरमागे ४ बोनस शेअर्स देत आहे. या घोषणेचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या तेजीनंतर कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली.

आज बीएसईमध्ये कंपनीचा शेअर ४१२९.४५ रुपयांवर खुला झाला. काही काळानंतर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून ४५६७.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. बीएसईमध्ये कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३११६.१० रुपये प्रति शेअर आहे.

कंपनीने १४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले होते की, पात्र गुंतवणूकदारांना १० रुपयांच्या अंकित मूल्याच्या शेअरवर ४ नवे शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कंपनीच्या शेअरची कामगिरी कशी?

गेल्या तीन महिन्यांत गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत २१.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ६ महिने शेअर ठेवलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत ३९ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात या बोनस शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना ४२ टक्के परतावा दिला आहे. या शेअरची किंमत ५ वर्षात २८८ टक्क्यांनी वाढली आहे.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गरवारे टेक्निकल फायबर्सनं डिविडंड जाहीर केला होता. त्यावेळी कंपनीनं प्रति शेअर ३ रुपये अंतिम लाभांश दिला होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner