मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शेअर बाजार राहणार बंद? चेक करा सुट्ट्यांची यादी

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शेअर बाजार राहणार बंद? चेक करा सुट्ट्यांची यादी

Sep 18, 2023 03:46 PM IST

share market close on Ganesh Chaturthi : उद्या १९ सप्टेंबरला शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दोन्ही शेअर बाजार बंद राहिल. शेअऱ बाजाराशिवाय इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह आदी मंगळवारी १९ सप्टेंबरला बंद राहतील.

share market HT
share market HT

Ganesh Chaturthi 2023 : उद्या १० सप्टेंबरला शेअऱ बाजारात कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. गणेश चलुर्थीमुळे दोन्ही स्टाॅक एक्सेंज एनएसई आणि बीएसई बंद राहतील. शेअऱ बाजाराशिवाय इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह आदी मंगळवारी १९ सप्टेंबरला बंद राहतील.

गणेश चतुर्थी काय आहे आणि त्याचे महत्त्व काय ?

गणेश चतुर्थीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा सण अनंत चतुर्थीपर्यंत असतो.

ट्रेंडिंग न्यूज

गणेश चतुर्थीवर कमाॅडिटी ट्रेडिंग होईल का ?

मल्टि कमाॅडिटी एक्सेंजही सकाळच्या सत्रात व्यवहार बंद राहतील. हे ट्रेडिंग सेशन सकाळी ९ वाजता सुरू होते. आणि संध्याकाळी ५ वाजता संपते. दरम्यान, एक्सेंज संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहिल.

बीएसईच्या संकेतस्थळानुसार ही आहे सुट्ट्यांची यादी

गणेश चतुर्थी - १९ सप्टेंबर

महात्मा गांधी जयंती - २ आँक्टोबर

दसरा - २४ आँक्टोबर

दिवाळी बलिप्रतिपदा - १४ नोव्हेंबर

क्रिसमस - २५ डिसेंबर

WhatsApp channel