WhatsApp news : मेटाची ओनरशिप असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपमध्ये आता नवे अपडेटेड फीचर येणार आहे. या अपडेट फीचरमुळे यूझर्सचा चॅटिंगचा अनुभव आता आणखी भन्नाट होणार आहे. वापरकर्त्यांना त्यांचे प्रोफाइल सेटअप करण्याचा पर्याय नव्या अपडेटमध्ये दिला जाणार असून यात प्रोफाइल फोटो, नाव आणि स्टेटस अपडेट सोबत अवतार नावाचा नवा पर्याय जोडला जाणार आहे. या माध्यमातून यूझर्सना आता प्रोफाइल पेजवर ॲनिमेटेड अवतार सेट करता येणार आहे. हा अवतार कस्टमाइज देखील करता येणार आहे.
व्हॉट्सॲप अपडेट्स आणि फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या ब्लॉग साइट WABetaInfo ने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे की व्हॉट्सॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये नव्या बदलांचे संकेत मिळाले आहेत. गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सॲप अँन्ड्रॉईड २.२४.१७.१० बीटा आवृत्तीने उघड केले आहे की प्रोफाइल पेजवर व्हॉट्सॲप यूझर्सना आता अवतार हे नवे फीचर मिळणार आहे. ने नवे फीचर येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होईल.
WABetaInfo ने आपल्या अहवालासोबत एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसते की वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये ॲनिमेटेड अवतार समाविष्ट करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. हा अवतार मेटाच्या सेवांसाठी तयार केला जाऊ शकणार आहे. तसेच फेसबुक मेसेंजरपासून इंस्टाग्रामपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्याचे स्टिकर्स वापरण्याचा देखील पर्याय युझर्सना मिळणार आहे.
वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलवर त्यांची ॲनिमेटेड फोटों लावण्यासाठी म्हणजेच अवतार तयार करण्यासाठी या नव्या फीचरचा वापर करू शकणार आहेत. अवतार वापरकर्त्यासारखा दिसला पाहिजे आणि तो डिझाइन करण्यासाठी भरपूर सेटिंग्ज आणि कस्टमायझेशन पर्याय या नव्या अपडेट फीचरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या या फीचरची बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू असून नंतर ते इतर व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मेटा अल व्हॉईस फीचर देखील लवकरच मेसेजिंग ॲपमध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते वॉइस व्हॉईस कमांड देऊ शकतील. सध्या, वापरकर्त्यांना AI शी बोलण्यासाठी टेक्स्टचा पर्याय मिळतो. लवकरच ते सहजपणे एआयशी बोलून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार आहेत. वापरकर्त्यांना व्हॉईस मेसेजे मजकूरात रूपांतरित करण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे.