WhatsApp new feature : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी भन्नाट फीचर आणि नवे अपडेट आणले आहे. या मुळे व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव आता आणखी चांगला होणार आहे. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणलेल्या नव्या अपडेटमुळे त्यांना वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये लॉगिनचा पर्याय मिळणार आहे. मात्र, असे करतांना वापरकर्त्यांना कॉन्टॅक्ट लिस्ट बदलता येत नव्हती. नाव फोन नंबर अॅड करण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी आधी मोबाइल डिव्हाइसमध्ये तो क्रमांक सेव्ह करावा लागत होता. पण, आता यात बदल करण्यात आला आहे.
आता युजर्स कोणत्याही डिव्हाइसवरून कॉन्टॅक्ट्स अॅड किंवा मॅनेज करू शकणार आहेत. हे नवे फीचर सर्वप्रथम व्हॉट्सअॅप वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे फीचर लवकरच सर्व युजर्सना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या फीचरमुळे युजर्सना आता थेट व्हॉट्सअॅपमध्ये नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच त्यांना डिव्हाइसच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन आता फोन नंबर सेव्ह करावा लागणार नाही. याचा फायदा असा होईल की जेव्हा वापरकर्ते त्यांचा डिव्हाइस स्विच किंवा लिंक करतील तेव्हा ही नवी कॉन्टॅक्ट लिस्ट आपोआप नवीन फोन किंवा डिव्हाइसमध्ये अपडेट होईल. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट डिलीत होण्याची भीती वापरकर्त्यांना राहणार नाही व अॅपमध्येच त्यांना कॉन्टॅक्ट्स मॅनेज करता येणार आहे.
या नव्या फीचर बाबत व्हॉट्सअॅपने माहिती देतांना म्हटलं आहे की, वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट्स विविध परिस्थितीत उपयुक्त ठरणार आहेत. एखादा वापरकर्ता फोन इतरांसोबत शेअर करत असेल किंवा एका फोनमध्ये एकापेक्षा जास्त व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरत असतांना पर्सनल व बिझनेस कॉन्टॅक्टलिस्ट वेगळी असावी अशी इच्छा असणाऱ्यांसाठी हे नवे फीचर फायदेशीर ठरणार आहेत. सध्या युजर्सना चॅट करण्यासाठी त्यांना त्यांच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कॉन्टॅक्ट्स सेव्ह करावा लागतो, पण नव्या फीचरमुळे आता मोबाइल सेव्ह करण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सअॅप सध्या या मोठ्या अपडेटवर काम करत आहे. या नव्या फीचरमध्ये युजर्सला व्हॉट्सअॅपमध्ये चॅटिंगसाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. इन्स्टाग्रामच्या धर्तीवर युजर्स आपले युजरनेम तयार करून शेअर करून इतरांशी चॅटिंग करू शकणार आहेत. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅप युजर्सना प्रायव्हसी मिळेल आणि प्रत्येकाला आपला फोन नंबर देखील द्यावा लागणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
व्हॉट्सअॅपने युजर्ससाठीआणलेल्या या नव्या बदलाचा फायदा असा आहे की, युजर्सना मोबाइल डिव्हाइसवर नवीन कॉन्टॅक्ट्स सेव्ह करावे लागणार नाहीत व ते डेस्कटॉप कॉम्प्युटरवर लिंक केलेल्या व्हॉट्सअॅप अॅपमधील कॉन्टॅक्ट्सलिस्टमध्ये सहज सेव्ह करू शकतील. फोन कॉन्टॅक्ट्समध्ये न जाता नवीन कॉन्टॅक्ट्स सेव्ह करणे किंवा अस्तित्वात असलेले कॉन्टॅक्ट्स मॅनेज करण्याचे काम थेट मेसेजिंग अॅपमध्ये करता येणार आहे. युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन आणि त्यांचा चॅटिंगचा अनुभव सुधारण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या