whatsapp news : व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅटसाठी आणलं प्रत्येकाला आवडेल असं फीचर, काय आहे खास? वाचा!-gadgets news whatsapp is widely rolling out a group chat events feature to everyone know ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp news : व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅटसाठी आणलं प्रत्येकाला आवडेल असं फीचर, काय आहे खास? वाचा!

whatsapp news : व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅटसाठी आणलं प्रत्येकाला आवडेल असं फीचर, काय आहे खास? वाचा!

Aug 05, 2024 10:23 AM IST

WhatsApp Group Chat feature : व्हॉट्सॲपने ग्रुप चॅटसाठी एक अतिशय महत्त्वाचे फीचर आणले आहे. ही फीचर सुरुवातीला फक्त केबल कम्यूनिटी चॅटसाठी उपलब्ध होते. मात्र, आता हे फीचर ग्रुप चॅटसाठी देखील लागू करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅटसाठी आणलं भन्नाट फीचर! प्रत्येक युजरला आवडणार; 'हे' आहेत खास वैशिष्ट्
व्हॉट्सॲपनं ग्रुप चॅटसाठी आणलं भन्नाट फीचर! प्रत्येक युजरला आवडणार; 'हे' आहेत खास वैशिष्ट् (HT)

WhatsApp Group Chat feature : व्हॉट्सॲप यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने ग्रुप चॅट इव्हेंट्स फीचर आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. हे नवं फीचर जगभरातील लाखो व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्हॉट्सॲपनं सर्व iOS वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य आणलं आहे. यापूर्वी हे फीचर फक्त कम्युनिटी चॅटसाठी उपलब्ध होते. WABetaInfo ने या फीचरच्या रोलआउटबद्दल माहिती दिली आहे. नवीन फीचर आयओएस २४.१५.७९ साठी उपलब्ध करून देण्यात आले असून या नव्या फीचरबाबत WABetaInfo ने एका एक्स पोस्टमध्ये माहिती दिली आहे.

ग्रुपमध्ये तयार करता येणार इव्हेंट

व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे यूजर्स नियमित ग्रुप चॅटमध्ये इव्हेंट्स तयार करू शकणार आहेत. यामध्ये, वापरकर्त्यांना नाव, डिस्क्रिप्शन, डेट, ऑप्शनल लोकेशन प्रविष्ट करण्याचा आणि व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलदरम्यान या पैकी एक पर्याय निवड करता येणार आहे. याचा वापर करून, यूझर ग्रुपमध्ये इव्हेंट्स तयार आणि आयोजित करू शकतात. आमंत्रण स्वीकारल्यानंतर, ग्रुपच्या सर्व सदस्यांना कार्यक्रम सुरू होताच नोटीफिकेशन मिळेल. तसेच ग्रुपसाठी आयोजित केलेले हे कार्यक्रम एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार आहेत.

एन्क्रिप्शनमुळे केवळ ग्रुपमधील सदस्यांना इव्हेंट आणि व ग्रुपचॅटमध्ये बोलता येणार आहे. यूझर्सची गोपनीयता राखण्यासाठी हे एक महत्त्वाचे फीचर आहे. कंपनी हळूहळू सर्व आयओएस फोनसाठी हे नवे फीचर लागू करणार आहेत. अशा परिस्थितीत, येत्या काही दिवसांत ते प्रत्येक वापरकर्त्यापर्यंत पोहोचेल. तसेच ॲप स्टोअरवर उपलब्ध नव्या अपडेटमध्ये हे फीचर तुम्ही तुमच्यासाठी मिळवू शकता.

स्टिकर्ससाठी देखील नवे फीचर

व्हॉट्सॲपमध्ये स्टिकर्ससाठी एक उत्तम फीचर आणण्यात आले आहे. मॅनेज मल्टिपल स्टिकर्स इन बल्क असे या फीचरचे नाव आहे. WABetaInfo ने देखील कंपनीच्या या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. हे फीचर सध्या Android २.२४.१६.९ साठी WhatsApp बीटा मध्ये रोल आउट केले आहे. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते एकाच वेळी अनेक स्टिकर्स डिलीट आणि टॉप कलेक्शनमध्ये हलवू शकतात. बीटा चाचणीनंतर, कंपनी जागतिक वापरकर्त्यांसाठी हे फीचर लागू करणार आहे.

विभाग