future retail : अंबानी की अदानी?; 'या' कर्जबाजारी कंपनीचे 'फ्युचर' कोणाच्या हाती?
Future retail shares : फ्यूचर समूहाची कंपनी फ्यूचर रिटेलच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस अप्पर सर्किट लागत आहे. आजही अप्पर सर्कीट कायम राहिले.
Future retail shares : फ्यूचर समूहाची कंपनी फ्यूचर रिटेलच्या शेअर्समध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे.आजही हे अप्पर सर्किट कायम राहिले आहे. फ्यूचर रिटेल कंपनीचे शेअर्स आज सुरुवातीच्या सत्रात ५ टक्क्यांपर्यंत तेजीसह २.८३ रुपयांवर ट्रेड करत होते.कंपनीच्या शेअर्समधील तेजीमागे एक प्रमुख कारण आहे. वास्तविक दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या फ्यूचर रिटेलला खरेदी करण्याच्या स्पर्धेत अदानी अंबानींसहित ४९ दिग्गज कंपन्या सहभागी आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल कारभारातील होल्डिंग कंपनी आहे. एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ही अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि फ्लेमिंगो ग्रुप यांच्यातील संयुक्त कंपनी आहे. फ्यूचर रिटेलच्या कर्जदारांनी नवीन निविदा मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ईओआय पुन्हा एकदा सादर केल्या आहेत.
एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) सादर केलेल्या इतर काही कंपन्यांमध्ये सेंच्युरी कॉपर कॉर्प, ग्रीनटेक वर्ल्डवाइड, हर्षवर्धन रेड्डी, जे सी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, पिनॅकल एअर प्रायव्हेट लिमिटेड, युनिव्हर्सल असोसिएट्स आणि डब्ल्यूएचएसमिथ ट्रॅव्हल लिमिटेड यांचा समावेश आहे. या सर्व ४९ उत्सुक कंपन्यांना रिझोल्यूशन प्लॅन सादर करण्याची परवानगी दिली जाईल.
संबंधित बातम्या