EPFO : विना प्रिमियम भरता ७ लाखांपर्यंत घ्या विम्याचा लाभ, त्यासाठी हवे तुमच्याकडे हे खाते, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO : विना प्रिमियम भरता ७ लाखांपर्यंत घ्या विम्याचा लाभ, त्यासाठी हवे तुमच्याकडे हे खाते, जाणून घ्या

EPFO : विना प्रिमियम भरता ७ लाखांपर्यंत घ्या विम्याचा लाभ, त्यासाठी हवे तुमच्याकडे हे खाते, जाणून घ्या

May 07, 2023 10:56 AM IST

EPFO : या खात्यामध्ये कोणताही प्रीमियम न भरता ७ लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची सुविधा मिळते. जर सदस्याचा अकाली मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनी किंवा वारस विम्याचा दावा करू शकतात.

EPFO HT
EPFO HT

EPFO : जर तुमचे ईपीएफओ​​मध्ये खाते असेल, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण ईपीएफओच्या खातेधारकांना ७ लाख रुपयांच्या विम्याची सुविधा कोणताही प्रिमियम न भरत उपलब्ध आहे. ईपीएफओचे सर्व सदस्य या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

या विमा सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करण्याची गरज नाही. जर ईपीएफओ ​​सदस्याचा अकाली मृत्यू झाला तर त्याच्या विम्यावर दावा केला जाऊ शकतो. या सुविधेशी संबंधित नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

विम्याचा दावा कोण करु शकतो ?

ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम दिली जाते. ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर विम्याच्या रकमेवर नॉमिनी किंवा त्याच्या वारसदाराकडून दावा केला जातो. ईपीएफ कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास नाॅमिनी किंवा कायदेशीर वारस विम्यासाठी दावा करू शकतात. या योजनेअंतर्गत किमान विमा लाभ रक्कम अडीच लाख रुपये आहे. तर, विम्याची कमाल रक्कम ७ लाख रुपये आहे. विम्याची रक्कम नॉमिनीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

 

विम्याची रक्कम कशी ठरवली जाते?

विम्याच्या रकमेची गणना मृत ईपीएफओ ​​कर्मचाऱ्याच्या मागील १२ महिन्यांच्या पगाराच्या आधारे केली जाते. विम्याची रक्कम मागील १२ महिन्यांत मिळालेल्या मूळ वेतनाच्या ३५ पट आहे. त्याच वेळी, त्याची कमाल मर्यादा ७ लाख रुपये आहे. यापूर्वी विम्याची कमाल मर्यादा ६ लाख रुपये होती. मात्र आता सरकारने त्यात एक लाख रुपयांची वाढ केली आहे. या अंतर्गत, किमान २.५ लाख रुपयांचा विमा दिला जातो.

Whats_app_banner