free aadhaar update: आधार कार्ड फुकटात अपडेट करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  free aadhaar update: आधार कार्ड फुकटात अपडेट करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या

free aadhaar update: आधार कार्ड फुकटात अपडेट करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या

Updated Jun 13, 2024 05:02 PM IST

aahaar update deadline extended : मायआधार पोर्टलवर मोफत अपडेट करता येणार असून, ऑफलाइन अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

आधार कार्ड फुकटात अपडेट करण्याची मुदत वाढली! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या
आधार कार्ड फुकटात अपडेट करण्याची मुदत वाढली! कसा करायचा 'आधार'मध्ये बदल? जाणून घ्या

Aadhaar card update : आधार कार्डवरील स्वत:बद्दलच्या माहितीमध्ये मोफत बदल करण्यासाठी देण्यात आलेली १४ जूनपर्यंतची मुदत वाढवण्यात आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख आता १४ सप्टेंबर असेल.

मायआधार पोर्टलवर आधार कार्ड विनामूल्य अपडेट करता येणार आहे. मात्र, ऑफलाइन अपडेट केल्यास ५० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

aadhaar update
aadhaar update

यूआयडीएआयच्या वेबसाइटवरील ऑनलाइन पोर्टलवर तुम्ही १४ सप्टेंबरपर्यंत आधार कार्डवरील नाव, पत्ता, फोटो आणि इतर तपशीलात मोफत बदल करू शकता. ही तारीख वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा ही मुदत वाढवण्यात आली होती. सुरुवातीला आधार अपडेट करण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ ही तारीख देण्यात आली होती, ती नंतर १४ मार्च करण्यात आली. त्यानंतर ही तारीख १४ जून आणि आता १४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

आधार कार्डचा तपशील मोफत कसा अपडेट करावा?

> १६ अंकी आधार नंबर वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ लॉग इन करा

> कॅप्चा प्रविष्ट करा आणि 'ओटीपी वापरून लॉगिन' वर क्लिक करा.

> तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी कोड टाका.

> आता तुम्ही पोर्टल अ‍ॅक्सेस करू शकाल.

> 'डॉक्युमेंट अपडेट' हा पर्याय निवडा. तिथं रहिवाशाचे विद्यमान तपशील दाखवले जातील.

> ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा निवडा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.

> 'सबमिट' पर्यायावर क्लिक करा

> १४ अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट झाल्यानंतर अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.

Whats_app_banner