New Pan FAQ : केंद्र सरकार लवकरच नवीन पॅन कार्ड वापरात आणणार आहे. हे पॅन कार्ड क्यूआर कोडसह असेल. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आयकर विभागाकडून (Income Tax Department) एफएक्यू जारी करण्यात आले आहेत.
नाही. सध्याच्या पॅनकार्डधारकांना अपग्रेडेड सिस्टीम (पॅन २.०) अंतर्गत नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
नाही. पॅनधारकाला कोणतेही अपडेट आणि दुरुस्ती हवी असेल तर पॅन कार्ड बदललं जाणार नाही. सध्याचं वैध पॅन कार्ड पॅन २.० अंतर्गत वैध असेल.
प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदींनुसार कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडं एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्यानं ते क्षेत्रनिर्धारण अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणं आणि अतिरिक्त पॅन निष्क्रिय करणं बंधनकारक आहे. अद्ययावत प्रणालीमुळं एकापेक्षा जास्त पॅन असलेल्या व्यक्तीचं प्रमाण कमी होईल.
होय, जर विद्यमान पॅन धारकाला त्यांच्या विद्यमान पॅन तपशीलांमध्ये ई-मेल, मोबाइल किंवा पत्ता किंवा लोकसंख्याशास्त्रीय तपशील जसं की नाव, जन्मतारीख इ. मध्ये काही सुधारणा करायची असतील तर पॅन २.० प्रकल्प सुरू होईपर्यंत पॅनधारक एनएसडीएल आणि यूटीआयएसएल वेबसाइटवर जाऊन ईमेल, मोबाइल आणि पत्ता दुरुस्त करण्यासाठी आधार-आधारित ऑनलाइन सुविधेचा विनामूल्य लाभ घेऊ शकतात.
खालील वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पॅन कार्डमधील तपशीलात बदल करता येतील.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserAddressUpdate.html
आणि
https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange
जोपर्यंत पॅन कार्डधारकानं आपल्या विद्यमान पॅनमध्ये कोणत्याही अद्ययावत आणि दुरुस्तीसाठी विनंती केली नाही तोपर्यंत कोणतंही नवीन पॅन कार्ड वितरित केलं जाणार नाही. ज्या पॅनधारकांना आपला जुना पत्ता अपडेट करायचा आहे, ते एनएसडीएल किंवा यूटीआयएसएल वेबसाइटवर जाऊन आधार-आधारित ऑनलाइन सुविधेचा वापर करून विनामूल्य करू शकतात.
क्यूआर कोड शिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅनधारकांना सध्याच्या पॅन १.० तसेच पॅन २.० मध्ये क्यूआर कोडसह नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय आहे. क्यूआर कोड पॅन तपशीलाची पडताळणी करण्यास उपयुक्त ठरतो.
पॅन २.० प्रकल्प हा इन्कम टॅक्स विभागाचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून पॅन सेवेचा दर्जा वाढविणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
सध्या पॅनशी संबंधित सेवा तीन वेगवेगळ्या पोर्टलवर (ई-फाइलिंग पोर्टल, यूटीआयएसएल पोर्टल आणि प्रोटीन ई-गव्हर्नन्स पोर्टल) दिल्या जातात. पॅन २.० प्रकल्पात सर्व पॅन व टॅन संबंधित अर्ज आवश्यक आहेत. टीएएनशी संबंधित सेवा आयटीडीच्या एकाच युनिफाइड पोर्टलवर दिल्या जातील.
हे पोर्टल पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व सेवा (अलॉटमेंट, अपडेशन, करेक्शन) देईल. ऑनलाइन पॅन व्हेरिफिकेशन (ओपीव्ही), नो युवर एओ, आधार-पॅन लिंकिंग, तुमचे पॅन व्हेरिफाय करणे, ई-पॅनसाठी विनंती, पॅन कार्डच्या पुनर्मुद्रणाची विनंती इत्यादी सेवा देईल.
प्रचलित पद्धतीऐवजी ऑनलाइन पेपरलेस तंत्रज्ञानाचा वापर होईल.
भारताबाहेर कार्ड वितरित करण्यासाठी अर्जदाराला १५ रुपये + वास्तविक भारतीय टपाल शुल्क आकारले जाईल.