Xiaomi SU7 Price: स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर शाओमी कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. शाओमीची पहिली इलेक्ट्रीक कार शाओमी एसयू ७ लवकरच जागतिक बाजारात दाखल होत आहे. यापूर्वीच कंपनीने या कारबाबत माहिती दिली. या कारच्या संभाव्य किंमतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेई जून एसयू ७ ला हाय-परफॉर्मन्स ईव्ही मॉडेल म्हणून संबोधत आहेत. 'स्पीड अल्ट्रा'साठी संक्षिप्त असलेल्या एसयू ७ ने या वर्षाच्या सुरुवातीला मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये पदार्पण केले होते. या कार्यक्रमात शाओमी एसयू ७ एका चार्जमध्ये १२०० किलोमीटरपर्यंत अंतर कापेल, असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्याने केला होता.
शाओमी एसयू ७ इलेक्ट्रिक कार शाओमी एसयू ७ मॅक्स आणि शाओमी एसयू ७ स्टँडर्ड या दोन व्हर्जनमध्ये लॉन्च बाजारात दाखल होणार आहे. शाओमी एसयू7 मॅक्स ६७३ एचपी पॉवर आणि ८३८ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्याचा दावा करतो. शाओमी एसयू ७ ची स्टँडर्ड आवृत्ती २९९ एचपी ते ३७३ एचपी दरम्यान असेल आणि ६३५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल.
शाओमी एसयू ७ कार चीनच्या बर्याच भागांमध्ये डीलरशिपवर येण्यास सुरवात झाली. सीईओ जून यांनी संकेत दिले आहेत की, किंमत ५००,००० युआन (अंदाजे ६९ हजार डॉलर किंवा ५७ लाख रुपये) पेक्षा कमी असेल. जागतिक आणि स्थानिक ब्रँडच्या ईव्हीने भरलेल्या बाजारपेठेत, शाओमी एसयू ७ स्वत: साठी जागा तयार करण्याच्या विचारात आहे. शाओमी ही चीनची पाचवी सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. पण ईव्ही क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा आधार घेत आहे.