IPO News : आयपीओ येण्याआधीच शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, आहे कोणती ही कंपनी?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : आयपीओ येण्याआधीच शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, आहे कोणती ही कंपनी?

IPO News : आयपीओ येण्याआधीच शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, आहे कोणती ही कंपनी?

Jan 24, 2024 07:22 PM IST

Fonebox Retail IPO News : आयपीओच्या प्रतीक्षेत असलेल्या शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी खूषखबर आहे. २५ जानेवारीला एका कंपनीचा आयपीओ येत आहे.

IPO News
IPO News

Fonebox Retail IPO News : आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नवा आयपीओ येत आहे. फोनबॉक्स रिटेल असं आयपीओ आणणाऱ्या कंपनीचं नाव आहे. आयपीओ खुला झाला होण्याआधीच ग्रे मार्केटमध्ये फोनबॉक्सचे शेअर मोठ्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत.

फोनबॉक्स रिटेल कंपनीच्या आयपीओसाठी ६६ ते ७० रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये १२० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. ग्रे मार्केटमधील वातावरण पाहता फोनबॉक्स रिटेलचे शेअर्स १९० रुपयांच्या आसपास सूचीबद्ध होऊ शकतात, असा अंदाज आहे.

Amazon Republic Day Sale: भल्या मोठ्या टीव्हीवर ६४ टक्के सूट; अगदी स्वस्तात आणा घरी

फोनबॉक्स रिटेलचा आयपीओ ज्यांना लागेल, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी १७१ टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. आयपीओमधील शेअर्सचे वाटप ३१ जानेवारी २०२४ रोजी होईल. तर, कंपनीचे शेअर्स शुक्रवार, २ फेब्रुवारी २०२४ रोजी सूचीबद्ध होतील.

किरकोळ गुंतवणूकदार २००० शेअर्ससाठी पैज लावू शकतात!

रिटेल गुंतवणूकदार फोनबॉक्सच्या आयपीओच्या एका लॉटसाठी बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये २००० शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना १४०००० रुपये गुंतवावे लागतील.

फोनबॉक्स रिटेलचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. या आयपीओच्या माध्यमातून २०.३७ कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. फोनबॉक्स रिटेलमध्ये सध्या प्रवर्तकांची भागीदारी १०० टक्के आहे. आयपीओनंतर ती ७१.६४ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे. 

Sony Republic Day Sale : टीव्हीपासून स्पीकरपर्यंत सर्व काही स्वस्त; सोनीच्या सेलमध्ये सवलतींचा वर्षाव

काय करते कंपनी?

फोनबॉक्स रिटेल लिमिटेड ही स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीजची मल्टी-ब्रँड रिटेलर आहे. फोनबुक आणि फोनबॉक्स या दोन ब्रँड्सच्या नावानं कंपनी कार्यरत आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner