Stocks to Buy : अमेरिकेत सत्तांतर होऊन डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यामुळं साहजिकच अमेरिकेच्या आणि एकूण जगाच्या आर्थिक धोरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारात होत असलेल्या चढउतारामुळं तसे संकेत मिळू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी आजच्या खरेदीसाठी काही सल्ले दिले आहेत.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी काही शेअर्स सुचवले आहेत. त्यात पिरामल फार्मा लिमिटेड, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, सिएट लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, आयएफसीआय लिमिटेड, लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड आणि कॅस्ट्रोल इंडियाचा समावेश आहे.
हे शेअर किती रुपयांपर्यंत घेता येतील? टार्गेट प्राइस आणि स्टॉप लॉस किती असेल? जाणून घेऊया…
पिरामल फार्मा लिमिटेड २९३.५५ रुपयांना खरेदी करून ३११ रुपयांचं टार्गेट ठेवा. मात्र, २८३ रुपये स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
दीपक फर्टिलायझर्स १,४९१.६५ रुपये दरानं खरेदी करून स्टॉपलॉस १३४० रुपये ठेवावा.
हा आयटी शेअर १,८८० रुपयांच्या टार्गेटसह १,८२६ रुपयांना खरेदी करावा.
सिएट लिमिटेड २,८८० रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी २,७९० रुपयांना खरेदी करावा. स्टॉपलॉस २,७४० रुपये निश्चित करावा.
अदानी पोर्ट्स १३७० रुपयांना विकत घेऊन १,४२० रुपयांचं टार्गेट ठेवावं. स्टॉपलॉस १,२४५ रुपये ठेवावा.
हा शेअर ५९ रुपयांना घ्यावा. टार्गेट ६३ रुपये ठेवावं. स्टॉपलॉस ५७.२० रुपयांवर ठेवा.
लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड
लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स ७५.७ रुपयांना खरेदी करून ८२ रुपयांचं उद्दिष्ट ठेवावं. स्टॉपलॉस ७३.३० रुपये ठेवावा.
कॅस्ट्रोल इंडिया २१८ रुपयांत खरेदी करा, टार्गेट २३० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस २१३ रुपये ठेवा.